अहिल्यानगर
स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरीत आज छावा क्रांतिवीर सेनेचा प्रवेश सोहळा व मेळाव्याचे आयोजन
संगमनेर/ बाळासाहेब भोर : ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा लाभलेल्या स्वराज्यसंकल्प भूमी पेमगिरीत शहागडावर आज छावा क्रांतिवीर सेनेत अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे. तसेच कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीत ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कार्य केलं आहे अशा लोकांना कोरोना योद्धा सन्मानाने गौरविले जाणार आहे.
यावेळी शेती, शिक्षण, आरोग्य, उद्योग, पर्यावरण, पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे, दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आज सायंकाळी ठीक 6 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल. पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असं आवाहन आयोजक इंजि.आशिष कानवडे, रवी डुबे, रोहित यादव, गणेश थोरात यांनी नागरिकांना केलं आहे.