अहिल्यानगर
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शर्मा यांनी घेतले शनिदेवाचे दर्शन
राहुरी प्रतिनिधी : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरजभैय्या शर्मा यांनी आज शनि शिंगणापूर येथे शनिदेवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा अहमदनगर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.
धीरजभैय्या शर्मा हे शनि शिंगणापूर येथे आले असता सत्कार करताना युवराज पवार समवेत अनिकेत दरंदले पाटील…
यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी के दरदंले, विश्वस्त आढाव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कोकण विभागीय अध्यक्ष किरण शिखरे, अहमदनगर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस युवराज पवार, अनिकेत दरदंले पाटील, अनिल शेटे, जावेदभाई इनामदार आदी उपस्थित होते.