सामाजिक

बालसंगोपन योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्यांना मिळवून देण्याचे उद्दिष्ट – ढुस

व्हिडीओ पहाबालसंगोपन योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्यांना मिळवून देण्याचे आमचे उद्दिष्ट – आप्पासाहेब ढुस

राहुरी विद्यापीठ/ जावेद शेख : बालसंगोपन योजनेचा लाभ राहुरी तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना मिळवून देण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका समन्वयक तथा देवळाली प्रवरा हेल्प टीमचे सदस्य आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी प्रतिपादन केले.

राहुरी फॅक्टरी येथील राहुरी अर्बन पतसंस्थेचे चेअरमन आणि देवळाली हेल्प टीमचे सदस्य प्रशांत काळे यांचे जन्मदिनाचे प्रसंगी नुकत्याच झालेल्या दिवाळी सण आणि येत्या १४ तारखेला असलेल्या बाल दिनाचे औचित्य साधून देवळाली प्रवरा येथील ऊस तोड कामगारांचे मुलांना उसाचे शेतात जाऊन कपडे भेट देत देवळाली हेल्प टीमने जन्मदिन साजरा केला त्या प्रसंगी आप्पासाहेब ढुस बोलत होते.
प्रसंगी एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका समन्वयक आप्पासाहेब ढुस व प्रशांत कराळे यांचे सह राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, हेल्प टीमचे दत्ता कडू पाटील, प्रशांत काळे, धनंजय डोंगरे, गिताराम बर्डे, ऋषिकेश संसारे, विजय कुमावत, खालिद शेख, सागर सोनवणे, ऊस तोड कर्मचारी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ढुस म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाचे वतीने राज्यातील कोरोना किंवा अन्य कारणाने मृत्यू झालेल्या पालकांचे ० ते १८ वर्षे वयोगटातील पाल्य (मुले/मुली) यांना प्रतिमाह रू. ११००/- (अक्षरी रुपये अकराशे मात्र) रुपयांची बाल संगोपन योजना उपलब्ध आहे. राहुरी तालुक्यातील जवळपास १७५ मुलांना ही योजना मंजूर करून घेण्यात आजपर्यंत यश आले असून तालुक्यातील कोणीही मुले या योजनेपासून वंचीत राहू नयेत म्हणून १००% लाभार्थी मुलांना ही योजना लागू करून घेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
राहुरी तालुक्यातील पालक गमावलेला कोणताही मुलगा किंवा मुलगी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी आम्हाला आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. म्हणून सर्वांना या जाहीर आवाहनाद्वारे नम्र विनंती आहे की, आपल्या कुटुंबातील, नात्यातील, मित्र परिवारातील किंवा गावातील ० ते १८ वयोगटातील ज्या कोणत्याही बालकांचे पालकाचा कोरोना किंवा अन्य कारणाने मृत्यू झाला आहे. अश्या बालकांना उपरोक्त बाल संगोपन योजना लागू करून देऊन त्या बालकांचे शिक्षण व इतर खर्चासाठी कुटुंबाला आर्थिक आधार देणेसाठी अश्या बालकांना जिल्हा महिला बाल व विकास अधिकारी कार्यालय अहमदनगर येथील बाल कल्याण समितीच्या समोर खालील कागदपतत्रासह हजर करावे किंवा तशी त्या कुटुंबाला माहिती द्यावी. तदनंतर त्या मुलांना हा लाभ चालू होतो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :- 
(१) मुलाचे आधार कार्ड / जन्माचा दाखला 
(२) आईचे आधार कार्ड 
(३) रेशनकार्ड 
(४) राष्ट्रीयकृत बँकेचे खाते 
(५) वडील किंवा आई मयत चा दाखल 
(६) पालक कोरोना मयत असेल तर मयत व्यक्ती कोरोना चा उल्लेख असलेला दवाखान्याचा दाखला 
(7) उत्पन्न दाखला 1 लाख खलील 
 (8) शाळेचे बोनाफाईड 
(9)मुलाचे पासपोर्ट साईज फोटो 
(10) घराचा समोर परिवाराचा एकत्र फोटो 
(11) शाळांची फी बाबत माहिती 
अधिक माहिती साठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय अहमदनगर, अर्पित हाऊस, जव्हेरी यांची इमारत, छबुराव लांडगे चौक, सर्जेपुरा, अहमदनगर येथे तसेच (१)संपर्क क्र 9021116805 बाळासाहेब साळवे सामजिक कार्यकर्ता जिल्हा बाल संरक्षण कक्ष अहमदनगर (२)संपर्क क्र. 8805961414 प्रकाश वाघ सामजिक कार्यकर्ता जिल्हा बाल संरक्षण कक्ष अहमदनगर (३) संपर्क क्र. 9921307302 सर्जेराव शिरसाठ संस्थाबाह्य संरक्षण अधिकारी जिल्हा बाल संरक्षण कक्ष अहमदनगर 
यांच्याशी संपर्क करावा. 
ही योजना लागू करून घेणेसाठी कोणतीही फी लागत नाही. त्यामुळे जर अशी कामे करून देणेसाठी कोणी पैसे मागत असेल तर त्याबद्दल जिल्हा बाल विकास समितीचे अध्यक्ष हनिफ शेख यांचेकडे तात्काळ लेखी तक्रार दाखल करावी किंवा आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन याप्रसंगी बोलताना आप्पासाहेब ढुस यांनी केले.

Related Articles

Back to top button