ठळक बातम्या

पद्मश्री पोपटराव पवार हे छोट्या समाजसेवकांसाठी प्रेरणास्थान – शिवाजीराजे पालवे

पद्मश्री पोपटराव पवार यांचा सत्कार करताना शिवाजीराजे पालवे, महादेव शिरसाट, भाऊसाहेब देशमाने आदी…

अहमदनगर प्रतिनिधी : आर्दश गाव हिवरेबाजारचे सरपंच आर्दश गाव समितीचे अध्यक्ष व भारत सरकार वन समितीचे सदस्य असलेले पोपटराव पवार यांना भारत सरकार कडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या शुभहस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन अहमदनगर कडून पोपटराव पवार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी फौंडेशनचे शिवाजीराजे पालवे, महादेव शिरसाट, भाऊसाहेब देशमाने, संजय पाटेकर, धर्मराज ठाणगे, आधार सेवा संकल्पचे जयवंत मोटे, अजित मोटे, कृष्णा काकडे आदि उपस्थित होते.
पोपटराव पवार यांनी हिवरेबाजार हे गाव आर्दश गाव बनवले. भारत देशात या गावची ओळख तयार केली. देशातील हजारो गावे आर्दश करण्यासाठी चौदा लाख किलोमीटर प्रवास करुन अनेक गावांना आर्दश गाव बनवले. पोपटराव पवार यांनी जनसेवेसाठी केलेला संर्घष, त्यागाचे हे फलित आहेे.
देशातील समाजसेवकांचे प्रेरणास्थान म्हणुुन पोपटराव पवार यांची ख्याती आहे. जय हिंद सैैैनिक फौंडेशनने पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हात हजारो झाडे लावली आहेत. पोपटराव पवार महाराष्ट्राची शान आहे. अहमदनगर जिल्ह्याचा अभिमान आहे. आमच्या सारख्या छोट्या समाजसेवकासाठी प्रेरणास्थान असल्याचे शिवाजीराजे पालवे यांनी प्रतिपादन केले आहे.

Related Articles

Back to top button