अहिल्यानगर
मी ओबीसी असल्यानेच नागवडे यांनी माझे संचालकपद काढले-आण्णासाहेब शेलार
श्रीगोंदा/सुभाष दरेकर : मी कारखान्याच्या कारभारावर स्पष्ट बोलतो, प्रश्न विचारतो व मी माळी समाजाचा असल्याने दोन वर्षांपूर्वी राजीनामा देऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करत मी मिटिंग ला उपस्थित राहत नसल्याचा ठपका ठेवत कोर्टात याचिका दाखल करून मला कारखाना संचालक पदावरून काढणाऱ्या सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे आमदारकी चे स्वप्न पाहत आहेत. पण केवळ मी माळी समाजाचा असल्याने जर मला संचालक पदावरून काढून तसेच तालुक्याचे मिनी आमदार असलेल्या पंचायत समिती सभापती गीतांजली पाडळे मागासवर्गीय असल्याने जाणीवपूर्वक त्यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत टाळत आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही असे थेट विधान आज मढे वडगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जि. प. माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांनी केले.
यावेळी स.शी.ना.नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन केशवभाऊ मगर, मा. संचालक ॲड बाळासाहेब काकडे, जिजाबापु शिंदे, वैभवदादा पाचपुते, प्रशांत दरेकर आदी उपस्थित होते.
पुढे शेलार म्हणाले स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमात कारखाना उभारणी बापूंच्या खांद्याला खांदा लावून झटणारे स्वत:च्या जमिनी विकून प्रसंगी पत्नीचे दागिने विकून पैसा उभा करणाऱ्याांच्या प्रतिमा तर लावल्या नाहीच पण त्यांच्या वारसाचे साधे नामोल्लेख ही केला नाही. सभासदाच्या उसाच्या टनामागे 15 रुपये कापून घेतलेल्या कार्यक्रमाच्या स्टेजवर फक्त नातेवाईकच होते हा कार्यक्रम कौटुंबिक नसुन संचालक, सभासदांचा ही होता याचा राजेंद्र नागवडे यांना विसर पडला. चव्हाट्यावर येत असलेल्या कारखान्याचा गैर कारभार झाकण्यासाठी मुबंई ला जाऊन मोठ्या नेत्यांचे पाय धरून कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी विनवणी केली. पण पुतळा अनावरण करण्यासाठी उपस्थित राहिलेले राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा कारखान्यातील झालेल्या चुका सुधारण्याचा सल्ला दिला.
स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या नावाने हॉस्पिटल उभारण्यासाठी शिक्षकांच्या पगारातून साडे तीन कोटी रुपये जमा केले. पण हॉस्पिटलचा पत्ताच नाही असे सांगत ज्या बापूंच्या मुळे सहकार टिकला त्यांचा पुत्र मात्र कारखान्याचे खाजगीकरण केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळेच त्यांचा ओढा खाजगी कारखाना, खाजगी शिक्षण स्वस्थाकडे आहे असेही म्हणाले.
माझे संचालक पद काढले तरी मी वरच्या कोर्टात जाणार आहे आणि मी निवडणूक सुद्धा लढवणार आहे असे सांगत ठराविक समाजाला बाजूला करून, जाणीव पूर्वक टाळून राजकारण करू शकणार नाही.
यावेळी केशवभाऊ मगर यांनी आपण सहकार महर्षी स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या तालमीत सहकाराचे धडे घेतले असून खाजगी संस्था काढणार्यांना सहकाराची काय गरज आहे असा प्रश्न राजेंद्र नागवडे यांंचे नाव न घेता विचारला आहे. राजेंद्र नागवडे यांनी जाणीवपूर्वक आण्णासाहेब शेलार यांचे संचालक पद घालवले. 11 वर्षांपासून डिस्टलरी बंद आहे. इथेनॉल निर्मितीचे फक्त आश्वासन देत आहेत. 95 कोटीचे कर्ज कारखान्यावर आहे. कारखाना उभारणीत मोलाची साथ देणाऱ्या सभासदांना मतदानापासून वंचीत ठेवत अपात्र ठरवण्याचा कुटील डाव नागवडे यांनी केला होता. पण न्यायालयीन लढाई लढून शेतकरी आघाडी सहकार बचाव पॅनेलने त्या सभासदांना मतदानाचा हक्क मिळवुन दिला. स्वर्गीय बापूच्या पुतळा अनावरण कार्यक्रम पत्रिकेत मागासवर्गीय समाजाच्या सभापती पाडळे ताई, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दीपक भोसले पाटील, राष्ट्रवादी चे हरिदास शिर्के, सेनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब दूतारे यांचे नावे टाकायला कमीपणा का वाटला असा प्रश्न केला.