गुन्हे वार्ता

अवैध धंद्याविषयी आवाज उठवल्याने जीवे मारण्याची धमकी

शिवशंभो प्रतिष्ठानचे सौदागर यांचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्र; सौदागर यांचा आत्महदनाचा इशारा…
राहुरी/ वृत्तसेवा : तालुक्यातील गुहा येथे नगर-मनमाड मार्गावरील एका हॉटेलवर अवैध धंदा सुरू आहे. त्यासंदर्भात छावा शिवशंभो प्रतिष्ठानचे राज्य संपर्कप्रमुख सतीश सौदागर यांनी आवाज उठविला असता अवैध धंदे चालक व मालक यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी येत असल्याने याप्रश्नी तातडीने कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे यांना पाठविलेल्या निवेदनात शिवशंभो छावा प्रतिष्ठानचे संपर्क प्रमुख सतीश सौदागर यांनी केली आहे.
सौदागर यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले की, गुहा येथे नगर-मनमाड मार्गावरील एका हॉटेलमधील अवैध दारू विक्री प्रकरणी गेल्या महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. तरीही सदर हॉटेल व्यावसायिकाकडून अद्याप अवैध देशी व विदेशी दारू विक्री सुरू असल्याने याबाबत आवाज उठविला असता हॉटेल चालक व गावातील काही मंडळींकडून धमकीचे फोन येत आहे. यातून माझ्या जीवाताला धोका निर्माण झाला आहे. तरी मला फोन करून धमकी देणाऱ्यांवर व संबंधित हॉटेल चालक मालक यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा १२ नोव्हेंबर रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे आत्मदहन करणार असल्याचा इशारा सौदागर यांनी दिला आहे.

Related Articles

Back to top button