अहिल्यानगर
प्रहार दिव्यांग संघटनेच्या माहेगांव शाखा अध्यक्षपदी आढाव तर उपाध्यक्षपदी हापसे
प्रहार दिव्यांग संघटनेच्या माहेगाव शाखा पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देताना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे समवेत मधुकर घाडगे, आप्पासाहेब ढोकणे आदी… ( छाया : दत्तात्रय कवडे )
आरडगांव/राजेंद्र आढाव : प्रहार दिव्यांग संघटनेच्या माहेगांव शाखा अध्यक्ष पदी भरत अंबादास आढाव व शाखा उपाध्यक्ष पदी जगन्नाथ आनंदा हापसे यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या दौऱ्या प्रसंगी महाडुक सेंटर येथे ना. तनपुरेंच्या हस्ते नियुक्त पत्र देऊन नवनियुक्त पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. राहुरी तालुक्यात प्रहार दिव्यांग संघटना गावागावात शाखा स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी तालुका अध्यक्ष मधुकर घाडगे यांनी दिली आहे.
या प्रसंगी जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे, तालुका उपाध्यक्ष पांडे, तालुका संपर्क प्रमुख रविंद्र भुजाडी, टाकळीमिया शाखा अध्यक्ष नानासाहेब शिंदे, शहर शाखा उपाध्यक्ष सुरेश दानवे, संघटक शंकर कांगळे, दरंदले पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले तर आभार नुतन अध्यक्ष भरत आढाव यांनी मानले आहे.