टाकळी अंबड येथील अनेकांचा शिवसेनेत प्रवेश
विंहामाडवा सर्कल मधील सर्वात मोठे गाव असलेल्या टाकळी अबंड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका सरचिटणीस विष्णु वाकडे सह सरपंच सुनील घायतडक यांनी आपल्या समर्थकांसह राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे, औंरगाबाद जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, नाथसंस्थानचे विश्वस्त दादा बारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजु नाना भुमरे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, युवासेनेचे जिल्हाधिकारी किशोर चौधरी, भारत लांडगे , अॅड पांडुरंग वाकडे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला .
याप्रसंगी बोलताना रोहयो मंत्री संदीपान भुमरे म्हणाले की, टाकळी अबंड गावातील जुने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका सरचिटणीस विष्णु वाकडे सह त्यांच्या कार्यकार्त्यांनी शिवसेनेत त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून प्रवेश केला. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गोदावरी नदीच्या परीसरात टाकळी अबंड ह्या गावात ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केले की, रेणुका शरद सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून तुमच्या ऊसाचे एक टिपरू ही राहू देणार नाही. ते कारखाना मार्फत नेले जाईल. यावेळी विठ्ठल गुरूजी वाकडे, रेणुका शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय वाकडे, रावसाहेब घावट,संपत गांधले, सतिश आंधळे, अमोल नरके, प्रदीप नरके, बाबासाहेब निकाळजे, अनिल घायतडक,लक्ष्मण राऊत, अरविंद वाकडे,भागवत वाकडे, बापु वाकडे,राम वैद्य, दिपक पाचे, अरूण निकाळजे, योगेश डांगरे, नितीन येवले, विनोद निकाळजे, दिलीप निकाळजे, युवराज घायतडक, भिमराज घायडक, बाबासाहेब पवार, कैलास राऊत, चंदू शिंदे, दिपक वाकडे, अशोक दहिवाळ सह आदी उपस्थित होते.