साहित्य व संस्कृती
मराठा महासंघाची समाजातील घटकांना सामावून घेऊन न्याय देण्याची भूमिका – महंत उद्धव महाराज मंडलीक
राहुरी शहर /अशोक मंडलिक
समाजातील सर्व घटकांना सामावून घेऊन न्याय देण्याची भूमिका मराठा महासंघ घेत असल्याने राज्यामध्ये महासंघाची वेगळी ओळख असल्याचे गौरवोद्गार ह.भ.प उध्दव महाराज मंडलीक नेवासेकर यांनी राहुरीत बोलतांना काढले.
अखिल भारतीय मराठा महासंघ राज्य शाखेच्या वतीने ‘ पुढचं पाऊल’ ही मराठा समाजाला मार्गदर्शन करणारी पुस्तिका काढली. संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात या पुस्तिकेचे प्रकाशन कार्यक्रम घेण्यात येत आहेत. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या पुस्तकाचे सर्वच स्वागत होत आहे. नगर जिल्हा मराठा महासंघाचे वतीने दिपावली पाडव्याचे औचित्य साधून जिल्हा शाखेच्या वतीने एका कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. पुढचं पाऊल या पुस्तकाचे प्रकाशन ह.भ.प. उद्धव महाराज मंडलीक यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव डौले पाटील होते.
या वेळी मार्गदर्शन करतांना ह.भ.प. उध्दव महाराज मंडलीक नेवासेकर म्हणाले, आज समाजात विविध संघटना काम करत असताना उद्दीष्ट ठेवून कार्य करत असते. मराठा महासंघाची उद्दीष्ट्ये व कार्यपद्धती अत्यंत कौतुकास्पद आहे. सामाजातील विविध घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली जाते. या सामाजिक काम करण्याच्या पध्दतीमुळे मराठा महासंघाची राज्यात वेगळी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात जिल्हा सचिव रमेश बोरुडे यांनी मराठा महासंघ जिल्ह्यात करत असलेल्या कामाबाबत माहिती दिली. ’पुढचं पाऊल’ या पुस्तिकेत मराठा समाजाची असलेली आचारसंहिता विषद करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास, व्यावसायिकतेचा ध्यास, प्रगत शेती, विवाह सोहळे, आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना, उत्पन्नाचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र आदी मुद्दे विषद करण्यात आले असल्याची माहिती श्री. बोरूडे यांनी दिली.
यावेळी मराठा महासंघाचे राहुरी तालुकाध्यक्ष अतुल तनपुरे, शहराध्यक्ष अमर भुजाडी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजेंद्र जाधव, राजेंद्र काळे, अॅड. संदिप भोंगळ, प्रदीप भुजाडी, जोगेश्वरी सोसायटीचे संचालक रोहीदास धनवडे, विलासराव वराळे, अशोकराव वामन, जोगेश्वरी सोसायटीचे माजी चेअरमन उद्धव हारदे, सोपानराव कातोरे, सुनिल कोरडे, कुंडलीक भुजाडी, सुदेश बोरुडे, चंद्रशेखर झावरे, आप्पा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. जोगेश्वरी सोसायटीचे माजी संचालक प्रदीप भुजाडी यांनी उपस्थितांचे आभार मानले.