गुन्हे वार्ता

कापुस खरेदी केंद्राचे गोदाम फोडून सव्वा लाखाचे पांढरे सोने चोरण्याचा प्रयत्न

•देवळाली प्रवरात पोलिसांची गस्तच नसल्याने चोरट्यांच्या पथ्यावर 
•पांढरे सोने चोरणारे स्थानिक चोरट्यांची माहिती, पोलिस माञ कारवाई करत नाही 
देवळाली प्रवरा राहुरी फॅक्टरी-श्रीरामपूर मार्गावरील देवळाली प्रवरा येथिल कापुस खरेदी केंद्रावरील पांढऱ्या सोन्यावर चोरांनी डल्ला मारला होता. सुदैवाने मानवी हाँटेल चालकाने पहाटे चार वाजता समोरील विजेचे दिवे लावल्याने चोरट्यांना 12 क्विंटल पांढरे सोने टाकुन पळून जावे लागले. हाँटेल चालकामुळे सव्वा लाखाचे पांढरे सोने चोरी जाता जाता वाचले आहे. पोलिस राञी गस्त घालत नसल्याने चोरट्यांचे फावले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.
देवळाली प्रवरा येथिल शेरकर वस्ती जवळील तेजस राजेंद्र कदम यांचे कापुस खरेदी केंद्र असुन या ठिकाणावरील गोडावून मध्ये मोठ्या प्रमाणात कापुस खरेदी करुन साठवणूक केला आहे. सोमवारी राञी ते मंगळवारी पहाटच्या दरम्यान चोरट्यांनी गोडावूनचा मागिल बाजुचा पञा उचकटून चोरट्यांनी 30 ते 35 गोण्या भरल्या पाठीमागिल बाजुने पञकार गणेश अंबिलवादे यांच्या रिकाम्या प्लाँट मध्ये आणून ठेवल्या. काही गोण्या गाडीत घालून नेण्यात आल्या. 30 ते 35 गोण्या नेण्यासाठी चोरटे आडोशाला बसुन होते. त्याच वेळी याच कापुस खरेदी केंद्रासमोरील हाँटेल मानवीचे चालक सतिष कराळे पहाटे चार वाजता हाँटेल मध्ये पाणी भरण्यासाठी आले असता त्यांनी हाँटेल समोरील सर्व विजेचे दिवे चालू केले. त्यामुळे चोरट्यांना या 30 ते 35 गोण्या नेता येईना अखेर चोरट्यांनी पांढरे सोने जागेवर सोडून देत काढता पाय घेतला. हाँटेल चालकामुळे सुमारे 12 क्विंटल पांढरे सोने वाचले आहे.
कापसाला सोन्या प्रमाणे दरोरज भाव वाढत आहे. यावर्षी पांढरे सोने 8 ते 9 हजार रुपयां पर्यंत पोहचले आहे. एका गोणित साधारण 30 ते 40 किलो कापुस भरला जातो.पाच गोण्यात दोन क्विंटल कापुस भरला जात असल्याने चोरट्यांनी पांढऱ्या सोन्याची चोरी करण्यास सुरवात केली आहे. घटनास्थळी पो.हे.काँ. पी. बी. शिरसाठ यांनी भेट देवून पाहणी केली. उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पांढरे सोने चोरणारे कोण आहेत याची पुर्ण माहिती पोलिसांना असतानाही पोलिस माञ कारवाई करत नाही. चोरट्यांना कोणाचा राजकीय आशिर्वाद आहे, याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये रंगत आहे.

Related Articles

Back to top button