अहिल्यानगर
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी जयश्री गीते तर उपाध्यक्षपदी सोमनाथ नरोडे
राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी जयश्री सतीश गीते यांची तर उपाध्यक्षपदी सोमनाथ काशिनाथ नरोडे यांची निवड करण्यात आली आहे.
शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्यकारणीवर मारुती नालकर, प्रताप नालकर, नितीन नरोडे, बापूसाहेब गिते, दिनेश पटारे, बाबासाहेब उंडे, संदीप नरोडे, प्रतिभा गिते, शरीन पठाण, कांचन झांबरे, स्वाती वैरागर, मारुती चोथे, किशोर त्रिंबके, सलीम सय्यद आदिंची देखील निवड करण्यात आली आहे.
यावेळी नुतन अध्यक्ष जयश्री गिते यांनी सांगितले की, सर्व प्रथम कोरोना मुळे शिक्षक -विद्यार्थी -पालक यांच्या मध्ये काहीसा संवाद कमी झाला आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये गरीब विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहीले आहे. त्यामुळे आता पुढील काळात लवकरच शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्याचा सर्व प्रथम प्रयत्न केला जाईल. तसेच शाळेतील कमी असलेले शिक्षक आणण्याचा प्रयत्न करू आणि अपुऱ्या वर्ग खोल्यांच्या प्रश्नासंदर्भात व नवीन जागेत शाळा स्थलांतरीत करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.
प्रसंगी अशोक माळी, मच्छिंद्र गोफणे, सौ लता पवार यांच्यासह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी सर्व नुतन पदाधिका-यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.