अहिल्यानगर

देवळाली प्रवरा व राहुरी फँक्टरी परीसरात विना परवाना फटाका विक्रेत्यांची चांदी

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी : देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीत विना परवाना फटाका विक्रेत्यांची चांदी झाली असुन पोलीस व महसुल प्रशासनाने हाताची घडी तोंडावर बोट ठेवून उघड्या डोळ्याने पाहुनही जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला जात असतानाहि कोणत्याहि विना परवाना फटाका विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली नाही. विना परवाना फटाका विक्रेत्यांबरोबर आर्थिक तडजोड करण्यात आल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे.
देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीतील देवळाली प्रवरा व राहुरी फँक्टरी, गुहा भागात विना परवाना फटाका विक्रीतुन चांदी झाली असुन किराणा दुकान, जनरल स्टोअर व घरात तसेच वाड्यावस्त्यावर फटाका विक्री केली जात आहे. नगर पालिका हद्दीत 18 व्यावसायिकांनी फटाका विक्रीचा परवाना काढला आहे. त्यामध्ये देवळाली प्रवरात 8 तर राहुरी फँक्टरी येथे 10 व्यावसायिकांनी फटाका परवाना घेतला आहे. नगर पालिकेने परवाना काढण्यासाठी नाहरकत दाखला देण्यापुर्वी फटाका व्यावसायिकांसाठी मोकळ्या जागेचा लिलाव केला होता. 8 ते 9 हजार रुपये भरुन फटाका व्यावसायिकांनी लिलाव घेतले. नाहरकत दाखल्यासाठी स्वतंञ फि आकारली आहे. लिलावाच्या वेळी नगर पालिकेने व परवाना घेतेवेळी पोलीसांनी परवाना धारका व्यक्तीरिक्त फटाका व्यवसाय करणाऱ्यावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते. परंतू याकडे नगर पालिका, पोलीस प्रशासन व महसुल प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. पोलिस व महसुल प्रशासनाच्या आशिर्वादाने कोणताही परवाना न घेता फटाका व्यासायिकांनी चांदी केली आहे. माञ परवाना धारक यांना माञ परवाना काढुन ग्राहकाची वाट पाहत बसावे लागत होते.
परवाना धारक फटाका व्यासायिकांना दुकान लावण्यापूर्वी विस हजार रुपये खर्च करुन व्यवसाय सुरु करावा लागतो. विनापरवाना फटाका विक्री करणाऱ्या व्यावसायिकास कोणताही खर्च न करता व्यवसाय सुरु करता येतो. कर्जत, श्रीगोंदा, नगर येथे विना परवाना फटाका विक्री करणाऱ्या व्यावसायिका विरोधात जिल्हाधिकारी आदेशाचा भंग केल्याबद्दल पोलीस प्रशासनाने कारवाई करुन गुन्हे दाखल केले आहेत. माञ देवळाली प्रवरा व राहुरी फँक्टरी, गुहा येथिल ठराविक भागात सर्रास विना परवाना फटाका विक्री सुरु असुनही पोलीस, महसुल, नगर पालिका प्रशासन माञ उघड्या डोळ्याने पाहत असुनही कारवाई करण्याचे धाडस करीत नसल्याने परवाना धारक फटाका व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पोलीस, महसुल व नगर पालिका प्रशासनाने सयुंक्त कारवाई करुन विना परवाना फटाका विक्री करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात कारवाई करण्याची गरज होती. अशी अपेक्षा देवळाली प्रवरा व राहुरी फँक्टरी येथिल परवाना धारक फटाका व्यावसायिकांनी केली आहे.
माझ्यावर कारवाई करुनच दाखवावी !
देवळाली प्रवरा येथिल एका जनरल स्टोअर्स मध्ये वर्षभर फटाके विक्री केली जाते. या दुकानदारास परवाना धारक फटाका विक्रेत्यांनी दिवाळीत तरी फटाके विक्री बंद ठेवावी आम्ही सर्व दुकानदार मोठा खर्च करुन परवाना काढीतो अशी विनंती त्या दुकानारास केली असता मी वर्षभर फटाके विकतो मी महसुल पोलिस यांना खुश ठेवतो त्यामुळे माझ्यावर कारवाई करुनच दाखवावी असे त्या दुकानदाराने परवाना धारक फटाका व्यावसायिकांना सांगितले.

Related Articles

Back to top button