अहमदनगर

बिरोबा दूध संकलन केंद्रातर्फे दूध उत्पादकांची साखर वाटून दिवाळी गोड

राहुरी शहर/अशोक मंडलिक : तालुक्यातील घोरपडवाडी येथील बिरोबा दूध संकलन केंद्रातर्फे वर्षभरात दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना एक रकमी ठेव तसेच बोनस म्हणून साखरेचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहूरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे उपस्थित होते. त्यांचा सन्मान बिरोबा दुध संकलन केंद्राचे चेअरमन गणेश तमनर यांनी केला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भैरवनाथ दूध संकलन व शीतकरण केंद्राचे चेअरमन पियुष (आबा) शिंदे तसेच अविनाश गाडे, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी कोंडीराम वडीतके, दिपक तनपुरे , भांड साहेब, चिंचाळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच बाबासाहेब कोळसे, चिंचाळे ग्रामपंचायतचे तंटामुक्ती अध्यक्ष मुरलीधर गडदे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांचा शाल,फेटा देऊन सत्कार करण्यात आला.
वर्षभरात जास्तित जास्त दुधपुरवठा करणाऱ्या दुध उत्पादकांचा प्रथम, व्दितिय व तृतिय क्रमांक काढले पैकी प्रथम क्रमांक रावसाहेब मारुती शेंडगे यांना १ लाख १६ हजार एकरकमी ठेव परत करून बोनस म्हणून ३२६ किलो साखर देण्यात आली. द्वितीय क्रमांक राजू देवकाते यांना १ लाख एक रकमी ठेव परत करून २८० किलो साखर देण्यात आली. तृतीय क्रमांक विजय नारायण झावरे यांना ६० हजार रुपये एक रकमी ठेऊ परत करून १५० किलो साखर देण्यात आली.
प्रथम, व्दितिय व तृतिय क्रमांकाच्या उत्पादकांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र शाल, फेटा, पुष्पगुच्छ देवून तिनही उत्पादकांचा सन्मान अरुण तनपुरे यांचे हस्ते करण्यात आला. तसेच सर्व उत्पादकांना साखर, मिठाई बॉक्स, चांदीच्या नाण्यासह साबण, फेना साबण अशा भेटवस्तू दीपावली निमित्त देण्यात आल्या.
बिरोबा दूध संकलन केंद्राचा पारदर्शक कारभार,वेळेवर पगार, गुणवत्तापूर्ण दूध, अडचणीच्या वेळी झालेला आर्थिक आधार, दूध उत्पादनात झालेली वाढ, स्पर्धेच्या युगात जास्तीचा दिलेला दुध दर, जनावरांसाठी खुरकुत व लंपी आजारासाठी लसिकरण पशुधन विभागामार्फत व्हावे अशी विनंती करण्यात आली. या आणि इतर विषयाबाबत विस्तृत माहिती व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दूध संकलन केंद्राचे संस्थापक नारायण तमनर यांनी केले. विकास गडदे व भाऊसाहेब शेंडगे यांचे मनोगते झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर मार्गदर्शनपर भाषणे झाली.
कार्यक्रमस्थळी घोरपडवाडी ग्रा.पं चे सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच घोरपडवाडी वि.का.स.से.सं.चे चेअरमन व संचालक मंडळ तसेच प्रामुख्याने दुध उत्पादक मोठ्या संख्येने हजर होते. आभार चिंचाळे ग्रामपंचायतीचे सदस्य बाबासाहेब वडितके यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Back to top button