अहिल्यानगर
देवळाली प्रवरा शहरात आधुनिक व्यायामशाळा सुरु
व्यायामशाळेचा शुभारंभ करताना हभप दुर्गाप्रसाद तिडके महाराज समवेत दत्ता कडु पाटील, आप्पासाहेब ढुस आदी…
देवळाली प्रवरा : शहरातील तरुणांना आपले शरीरसौष्ठव व बलसंर्वधनासाठी आधुनिक व्यायाम शाळा सुरु करण्यात आल्याचे प्रतीपादन हेल्प टीमचे प्रमुख दत्ता कडुपाटील यांनी केले.
व्हिडिओ पहा: देवळाली प्रवरा शहरात आधुनिक व्यायामशाळा सुरु
आज बलप्रतिपदेच्या मुहुर्तावर हभप दुर्गाप्रसाद तिडके महाराज यांचे शुभहस्ते या अद्यावत व्यायामशाळेचा शुभारंभ करण्यात आला. देवळाली प्रवरा शहरात तरुणांची वाढती संख्या पहाता त्यांना व्यायामासाठी अन्य गावांत जावे लागत होते. ही अडचण दुर करण्याची अनेक युवकांनी मागणी केली होती. या मागणीचा प्राध्यान्याने विचार करुन देवळाली प्रवरा शहरात सर्व सोईयुक्त अशी व्यायामशाळा सुरु करण्यात आली असुन ती सकाळी ५ ते ७ व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सर्वांसाठी खुली रहाणार आहे.
याठिकाणी प्रशिक्षित प्रशिक्षक नेमला असुन त्याचे देखरेखीखाली शास्त्रशुध्द मार्गदर्शन करुन युवकांना बलसाधनेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याने युवकात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी खुल्या मैदानात असलेल्या सिंगलबार व डबल सुविधेचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय खेळाडु आप्पासाहेब ढुस व जेष्ठ नागरिक शिवराम पाटील कडु यांचे हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी पत्रकार शिवाजी घाडगे, खालीद शेख, पांडुरंग शेटे, विजय कुमावत, गीताराम बर्डे, फ्रॅन्सीस संसारे, काबंळे मामा, सागर सोनावणे, गणेश रिंगे, शंकर धोत्रें, सतीश डोळस, दत्ता कडु, गणेश कडु आदिंसह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.