अहिल्यानगर

राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते मयत कुटुंबाला ८ लाखाची मदत

श्रीमती भाग्यश्री पगारे यांना ८ लाखांचा धनादेश देताना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे समवेत तहसीलदार शेख, नगराध्यक्ष अनिल कासार, गजानन सातभाई आदि (फोटो: जावेद शेख )


राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : राहुरी शहरातील गणपती घाट येथे दि. 5 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेली 2 मुले पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांचे मृतदेह दुसऱ्या दिवशी नदी पात्रात सापडल्याने सदर कुटुंबावर जी आपत्ती कोसळली होती. त्यातून सावरण्यासाठी त्यांना मदत मिळवून देण्यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्य राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रयत्न करून त्या मुलांच्या आईला मदत म्हणून ” आपत्ती व्यवस्थापन मदत कार्य निधीतुन ” कै अमर चंद्रकांत पगारे 15 वर्ष व कै सुमित चंद्रकांत पगारे 12 वर्ष यांचे दुर्दैवी निधन झाले म्हणुन त्या मुलांची आई श्रीमती भाग्यश्री चंद्रकांत पगारे हिस तहसीलदार शेख यांच्या हस्ते प्रत्येकी 4 लाख असे मिळून 8 लाखाचा धनादेश राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, नगराध्यक्ष अनिल कासार व गजानन सातभाई यांच्या उपस्थित देण्यात आला.
यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी समक्ष त्या महिलेची भेट घेऊन सर्व व्यथा ऐकून घेतली. सदर महिलेचा पती हा कुटुंबाला सोडून निघून गेल्याने सदर महिलेचा संसार उघड्यावर पडला आहे. सदर महिलेस एक मोठी मुलगी असून ती दहावी उत्तीर्ण आहे. तिची पुढील शिक्षणाची सोय राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी करण्याचे आश्वासन यावेळी दिले असून सदर मिळालेल्या रक्कमचा पुढील काळासाठी योग्य विनियोग करण्याचे श्री. तनपुरे व तहसीलदार शेख यांनी सूचना केली. सदर मदत मिळवून देण्यासाठी राज्यमंत्री तनपुरे यांच्या कार्यालयातील कर्मचार्यांनी मेहनत घेतली. सदर महिलेला तिच्या कुटुंबाची व्यथा मांडताना गहिवरून आले. सदर कुटुंबास अजून काही सहकार्य करता येईल का याबाबत ना. तनपुरे प्रयत्न करीत आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष आघाव, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष पांडू उदावंत, प्रसाद पवार, काशिनाथ रणसिंग, राजेंद्र रणसिंग आदि उपस्थित होते.

Related Articles

Back to top button