शिक्षणवारी ज्ञान पंढरी
नीट परिक्षेतील यशाबद्दल बोडकेंचा सत्कार
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील बिंबगव्हाण येथील विलास कुंडलिक बोडके या विद्यार्थ्यांने घरच्या हलाखीच्या परिस्थितीत नीट ( NEET ) परिक्षेत बायोलॉजी विषयात 360 पैकी 360 गुण मिळविले आहे.
विलास कुंडलिक बोडके या विद्यार्थ्यांने यश संपादित करत गावाचे नाव रोशन केले आहे. गरीब परिस्थितीत देखील विलास कुंडलिक बोडके या विद्यार्थ्यांने यश संपादित केल्याने त्याला पुढील आविष्यात प्रोत्साहन मिळावे, या हेतूने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. बोडके यांचा सत्कार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजू चंद्रवंशी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एन. व्ही. देशमुख, नगरीचे सरपंच गणेश वरड, बाळासाहेब नाईक, बाबुराव बोडके, माधव बोडखे, मनमत मारकड आदी उपस्थित होते.