अहिल्यानगर

कोपरगाव पूर्व भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा-पाडेकर

कोपरगाव पूर्व भागातील विविध समस्यांचे आमदार सुधीर तांबे यांना दिले निवेदन…


राहुरी विद्यापीठ/जावेद शेखकाँग्रेस पक्ष हा गोरगरीब जनतेचा पक्ष आहे. कोपरगाव तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढवून गोरगरीब जनतेची कामे करून विकास केला जाईल असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सुधीर तांबे यांनी केले.

आकाश नांगरे व रवींद्र साबळे यांनी आयोजित केलेल्या काँग्रेस सभासद नोंदणी अभियानांतर्गत मेळाव्याप्रसंगी व संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार तांबे यांनी कार्यकर्त्यांना घराघरात काँग्रेस पोहचवून विकास करावा त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात असे सांगितले. या काँग्रेस कार्यकर्ता व सभासद नोंदणी मेळाव्यात साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, काँग्रेसचे नेते ज्ञानदेव वाफारे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, कोपरगाव तालुका उपाध्यक्ष विष्णू पाडेकर आदींच्या उपस्थितीत हा मेळावा उत्साहात पार पडला.

या प्रसंगी आकाश नांगरे, ज्ञानदेव वाफारे, सचिन गुजर, सुभाष सांगळे यांनी भाषण करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. सध्याच्या काळात वाढत्या महागाईला फक्त काँग्रेसच वाचवू शकते. पेट्रोल, डिझेल, गॅस या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे जगणे असाह्य झाले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन युवा नेते आकाश नांगरे यांनी केले.

कोपरगाव पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून सोडवाव्यात, शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार सुधीर तांबे यांना निवेदन देण्यात आले. कोपरगाव काँग्रेस तालुका उपाध्यक्ष विष्णू पाडेकर यांच्या नेतृत्वाखाली दिलीप शिंदे, आदिनाथ सिनगर, सागर पगारे, दीपक भाटे, मयुर धोंड, उत्तम भातंकर, विलास नवले, अन्वरभाई शेख, अहमदभाई सय्यद, शाहरुख सय्यद ,रेखा धोंड आदींनी निवेदन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोपरगाव काँग्रेस अनुसूचित जातीचे अध्यक्ष रवींद्र साबळे यांनी केले.

Related Articles

Back to top button