शिक्षणवारी ज्ञान पंढरी

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कु. ढगे हिचा द्वितीय क्रमांक

राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वनस्पती शास्त्र विभाग आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कु. काजल राजू ढगे हिचा वक्तृत्व स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक आला. या वर्षी पुणे विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाने औषधी वनस्पती व मानवी जीवन या विषयावर स्पर्धचे आयोजन केले होते.

या स्पर्धेत कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी भाग घेऊ शकत होते. सावित्रीबाई फुले माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ येथील इयत्ता 9 वी ची विद्यार्थिनी कु. काजल राजू ढगे हिने पुणे येथे झालेल्या अंतीम फेरीमध्ये येऊन राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. पुणे विद्यापीठाचे वनस्पती विभाग प्रमुख प्रा. डॉ. अविनाश आडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेशजी पांडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील धन्वंतरी विभागातील डॉ. जांभळे, डॉ. बाळासाहेब आवारी विद्यालयातील बाळासाहेब डोंगरे, प्रा. अनघा सासवडकर यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, संस्थेचे सभापती डॉ. प्रमोद रसाळ, सचिव डॉ. महानंद माने, खजिनदार महेश घाडगे, मुख्याध्यापिका श्रीमती आशा धनवटे, उपमुख्याध्यापक नंदकुमार मुळे, पर्यवेक्षक नबाजी रहाणे, शमशुद्दीन इनामदार, प्रा. जितेंद्र मेटकर, अरूण तुपविहिरे, संतोष जाधव इतर सर्व सहकाऱ्यांनी काजलचे अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button