शिक्षणवारी ज्ञान पंढरी
राष्ट्रीय पात्रता परीक्षेत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अभुतपूर्व यश
राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : नवी दिल्ली येथील कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळातर्फे ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) महात्मा फुले कृषि विद्यापीठातील विविध विद्याशाखातील 138 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
विविध राज्यातील कृषि विद्यापीठे तथा कृषि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक व समकक्ष पदाकरीता राष्ट्रीय पात्रता परीक्षा अनिवार्य आहे. राहुरी अंतर्गत येणार्या कृषि महाविद्यालयांच्या 123 यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पदव्युत्तरचे 43 तर आचार्य पदवीचे 80 विद्यार्थ्यांनी नेट परीक्षेत यश संपादन केले आहे.
कृषि संशोधन सेवा भरती परीक्षेच्या लेखी परीक्षेत 15 विद्यार्थ्यांपैकी कृषि अभियांत्रिकीचे 04, मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र 01, वनस्पती रोगशास्त्र 02, विस्तार शिक्षण 02, कृषि वनस्पतीशास्त्र 02, बियाणे विज्ञान व तंत्रज्ञान 01, वनस्पती शरीरशास्त्र 01 व कृषि विद्या विषयाचे 02 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, कुलसचिव प्रमोद लहाळे यांच्यासह विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी यशस्वीतांचे अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांची 138 ही संख्या अंतिम नसून त्यात भर पडू शकते.