क्रीडा
स्टुडंट ओलंपिक असोसिएशनच्या संपर्क प्रमुखपदी व क्रिकेट टेक्निकल डायरेक्टर पदी सुर्यवंशी
राहुरी प्रतिनिधी : स्टुडंट ओलंपिक असोसिएशनची नुकतीच शिर्डी येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत स्टुडंट ओलंपिक असोसिएशन महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुखपदी तसेच क्रिकेट टेक्निकल डायरेक्टर पदी प्रा. पुरब सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली.
स्टुडंट ओलंपिक असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे महा सचिव सुनील शिंदे, राज्याध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या हस्ते प्रा. सुर्यवंशी यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे पाटील, रयत सेवक संघाचे अध्यक्ष व एस.एस.जी.एम. ज्युनिअर कॉलेज कोपरगावचे उप-प्राचार्य प्रा. गमे आर.एम., अहमदनगर जिल्हा माध्यमिक सहकारी बँकचे संचालक व मा.अध्यक्ष उत्तमराव खुळे, प्रा. प्रकाश यशवंत सूर्यवंशी, हॉलीबॉल खेळाचे आंतरराष्ट्रीय पंच आदिनाथ कोल्हे, राहुरी तालुका शिक्षक संघाचे सचिव राजेंद्र जाधव, अरुण काळे, संजय गांगड, सोमनाथ गांगड, जगन्नाथ इंगळे, डिजिटल कंप्यूटर ॲकॅडमीचे ज्ञानेश्वर सोळुंके, राहुल नालकर, सचिन कोहकडे आदींनी या निवडीबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.