अहिल्यानगर
राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते सडे गावातील १ कोटी ४५ लाख रूपयांचे विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळा संपन्न
सडे गावातील विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अरूण तनपुरे, धनराज गाडे, सरपंच चंद्रकांत पानसंबळ, धीरज पानसंबळ आदि…
राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : राहुरी तालुक्यातील सडे गावातील युवकांनी लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत पानसंबळ यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन गावाचा पूर्वीचा इतिहास बदलून गावाच्या विकासासाठी सर्व युवक एकत्र आल्याने सडे गावाचा चेहरा मोहरा बदलला असल्याचे उदगार राज्याचे ऊर्जा, नगरविकास, आदिवासी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काढले.
तालुक्यातील सडे गावातील १ कोटी ४५ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी ना. तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक तथा बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, गट नेते रवींद्र आढाव, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, उपसभापती प्रदीप पवार, सडे गावाच्या उपसरपंच सौ कल्पना साळवे आदि मान्यवर उपस्थित होते.
सभेपूर्वी ना. प्राजक्त तनपुरे यांनी गावाच्या विकासासाठी दिलेला शब्द पूर्ण केला म्हणून गावातून मिरवणूक काढण्यात आली. ग्रामसचिवालय इमारत, अंगणवाडी इमारत, आर ओ प्लॅन्टचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना ना. तनपुरे म्हणाले की, आमदार झाल्यापासून तालुक्यातील बहुतेक गावांसाठी आमदार निधी उपलब्ध करून दिला असून ज्या गावांना अजून निधी मिळाला नाही त्यांनाही निधी उपलब्ध करून दिला जाईल. बारागाव नांदूर गटातील बहुतेक गावांना निधी दिला आहे. कोरोना मुळे शासनाकडून निधी मिळण्यावर बंधने होती. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेवरून राज्यातील आदिवासी मतदार संघाचा अभ्यास दौरा केला. आदिवासी जनतेसाठी शासनाच्या विविध योजना असून त्याबाबत मार्गदर्शन केले. जातींचे दाखले घरपोच करण्याच्या दृष्टीने तेथील प्रशासनास सूचना दिल्या. आदिवासीसाठी घरकुल बांधण्यास जर जमीन नसेल तर शासनाची ग्रामपंचायतीची गायरान जमीन त्यासाठी उपलब्ध करून तिथे घरकुल उभारले जाईल.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रकल्प ग्रस्तांच्या प्रश्ना बाबत पक्षाध्यक्ष शरद पवार हे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून रिक्त जागा भरण्या बाबत लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री यांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगितले. राज्यात सत्तेवर आलेले महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येण्यास युवकांचे मोठे योगदान असून त्याचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सरकारची आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला महावितरणच्या विद्युत सहाय्यक भरतीचा प्रश्न मार्गी लागला असून एक हजार जणांचा प्रश्न सुटला असून उर्वरित भरती बाबत प्रयत्न सुरु असल्याचे ना. तनपुरे यांनी सांगितले.
जिल्हा बँकेचे संचालक अरुण तनपुरे यांनी अध्यक्षीय भाषणात सडे गावातील मतदारांनी सरपंच म्हणून एक तरुण सुसंस्कृत नेतृत्वास संधी दिल्याने गावाचा झपाट्याने विकास झाला आहे. सरपंच व त्याच्या सहकाऱ्यांनी गावासाठी चांगले काम केले असून युवक पद मिळाल्यावर कामाच्या रूपाने एक आदर्श जनतेसमोर निर्माण केला आहे. त्याच्या कामामुळे त्यांनी सुचविलेली कामे मंत्रीमहोदय निश्चित पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त केला.
सडे गावातील १ कोटी ४५ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित ग्रामस्थ…
यावेळी सरपंच चंद्रकांत पानसंबळ यांनी प्रास्ताविक स्वागत केले. राष्ट्रवादीचे युवकाध्यक्ष धीरज पानसंबळ, संदीप कसबे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवकाध्यक्ष प्रकाश देठे, नवाज देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे यांची भाषणे झाली.
कार्यक्रमांस डॉ तनपुरे कारखान्याचे संचालक भारत तारडे, बाजार समितीचे संचालक प्रभाकर पानसंबळ, के एम पानसरे, अण्णासाहेब बाचकर, जालिंदर आढाव, सुरेश निमसे, प्रभाकर गाडे, दशरथ पोपलघट, दिपक तनपुरे, बाळासाहेब लहारे, अतुल तनपुरे, दत्तात्रय पानसंबळ, सेवा संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब पानसंबळ, अनिल वाघ, दशरथ धोंडे, अरुण पानसंबळ, दत्ता धोंडे, बापूसाहेब तनपुरे, गोरक्षनाथ धोंडे, अण्णासाहेब पानसंबळ, चांद शेख, भीमराज खेडेकर, शिवाजी पानसंबळ, शंकर कसबे, बापूसाहेब नान्नोर, शिवाजी धामोरे, ग्रामपंचायत सदस्य अमोल धोंडे, धनंजय पानसंबळ, दिलीप जठार, शामराव खेतमालस, सरपंच निवृत्ती देशमुख, भाऊसाहेब गाडे, गोरक्षनाथ दुशिंग, विलास शिरसाठ, अय्युब पठाण, सुनील अडसूरे, भारत भुजाडी, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य गणेश घोरपडे यांनी आभार तर आप्पासाहेब ढोकणे यानी सूत्रसंचालन केले.