अहिल्यानगर
वरवंडी गावात पिक पाहणी मोबाईल अँपद्वारे गाव नमुना नं 12 मध्ये पीक नोंद करण्यासाठी शेतकर्यांना आवाहन
राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : कृषी महाविद्यालय सोनई चे कृषीदूत भालेराव शंकरानंद बाळू यांने ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत ‘ वरवंडी ‘ गावामध्ये पिक पाहणी मोबाईल ॲपद्वारे गाव नमुना नं. १२ मध्ये पीक नोंद करण्यासाठी शेतकर्यांना आवाहन व मदत केली आहे.
ई-पीक पाहणीद्वारे आपल्या शेतातील पिकाची नोंद आपणास स्वत: शेतात जाऊन करायची आहे. नोंद न केल्यास आपला ७/१२ मधील पीक फेरा कोरा राहील. यामुळे कोणतेही शासकीय मदत/ पीक विमा/ पीक कर्ज/ अनुदान प्राप्त होणार नाही याची नोंद घ्यावी.
ई-पीक पाहणी ॲपमुळे शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. यामुळे ना शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे, ना सरकारची फसवणूक. ॲपवरील नोंदींमुळे राज्यात, देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे; याची अचूक आकडेवारी एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
पिकांची अचूक आकडेवाडीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो. बी – बियाणे लागणारे खत उपलब्ध करून देता येणार आहे. देशात किती क्षेत्रावर किती उत्पन्न झाले हे सांगण्यासाठी देखील याचा उपयोग होणार आहे. एका मोबाईलमधून २० शेतकऱ्याच्या नोंदी करता येणार आहे, असे ई-पीक पाहणी चे फायदे यावेळी शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे.