महाराष्ट्र

औरंगाबाद येथील राज्यस्तरीय पेन्शनर्स अधिवेशनाची जय्यत तयारी…

श्रीरामपूर[बाबासाहेब चेडे] : इपीएस ९५ पेन्शनर्स यांच्या प्रलंबित पेन्शनवाढीच्या संदर्भात औरंगाबाद येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवतराव कराड व औरंगाबाद पूर्व आमदार अतुल सावे यांच्या उपस्थितीत अग्रसेन भवन टाऊन सेंटर सिडको बस स्थानक जवळ महाराष्ट्र राज्यस्तरीय पेन्शनर्स मेळावा‌ ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती राज्य कार्याध्यक्ष कमलाकर पांगारकर व पश्चिम महाराष्ट्र संघटक सचिव सुभाष पोखरकर यांनी दिली.

मेळाव्यास राष्ट्रीय संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत, राष्ट्रीय महासचिव विरेंद्रसिंग राजावत, राष्ट्रीय मुख्य सल्लागार डॉ पी एन पाटील, राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती शोभा आरस, पश्चिम क्षेत्र मुख्य समन्वयक सरिता वानखेडे, कमलाकर पांगारकर, एस एन आंबेकर, सुभाष पोखरकर, आशा शिंदे, महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. गेल्या ६ वर्षापासून पेन्शनर्स आपल्या मागण्यासाठी शांततामय मार्गाने देशभर आंदोलने करीत आहेत. ३ वर्षापासून बुलढाणा येथे साखळी उपोषण सुरु आहे.

दरम्यान काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन वेळा भेटी खा.हेमामालिनी समवेत शिष्टमंडळाने घेतल्या आहेत. पंतप्रधान यांनी सदर प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देखील दिले आहे. परंतु हा प्रश्न लवकर मार्गी लागावा म्हणून पेन्शनर्स बचावो अभियान अंतर्गत संघटना वाढीसाठी, मजबुतीसाठी हे अधिवेशन महत्वपूर्ण ठरणार आहे. राज्यातील पाच जिल्ह्यातील पेन्शनर्स यांनी उपस्थित राहावे असे आवाहन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देवीसिंग जाधव, पश्चिम महाराष्ट्र संघटक सचिव सुभाष पोखरकर, संपत समिंदर, नारायण होन, भगवंत वाळके आदी सर्व पदाधिकारी यांनी केले आहे. अधिवेशनाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.

Related Articles

Back to top button