शिक्षणवारी ज्ञान पंढरी
सात्रळ महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयाची पहिली आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न
चिंचोली/बाळकृष्ण भोसले : तालुक्यातील सात्रळ येथील पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद दूरदृश्य प्रणालीद्वारे यशस्वीरित्या संपन्न झाली.
जैन विद्यापीठ, बंगलोर येथील वरिष्ठ वैज्ञानिक प्रो. (डॉ.) रमेश दातीर यांनी बीजभाषण करून आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. परिषदेचे समन्वयक आणि महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. एस. घोलप यांनी अतिथींचा परिचय करून दिला. उपप्राचार्य प्रा. डी. एन. घोलप यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषण केले. रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रो. (डॉ.) एस. एस. पंडित यांनी परिषदेची भूमिका विशद केली.
आंतरराष्ट्रीय परिषदेत मॅन्चेस्टर, युनायटेड किंग्डम, अल्जेरिया व चीन या देशातील संशोधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याबरोबरच भारतातील विविध राज्यातील विद्यापीठामधील साधन व्यक्ती व सुमारे १००० संशोधक, उद्योजक आणि विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला. पहिल्या सत्रात डॉ. दातीर यांनी त्यांच्या भाषणात केटालेसिस, ऑरगॅनिक , सिंनथेसिस, ग्रीन सिंन्थेसिस या विषयावर विवेचन केले.
परिषदेच्या दुसऱ्या सत्रात पुणे येथील डॉ. विक्रम पंडित यांनी हायड्रोजन जनरेशन युजिंग फोटो कॅटालेसिस या विषयावर आपले विचार व्यक्त केले. या सत्रामधील वक्त्यांचा परिचय प्रा. डॉ. अमित वाघमारे यांनी करून दिला. परिषदेच्या तिसऱ्या सत्रात चीन येथील सियामन विद्यापीठामधील डॉ. ह्युबिओ झाहो यांनी सिंथेसिस ऑफ एन – हेटोसायकल कंपाऊंड या विषयावर आपले विचार मांडले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रो. (डॉ.) एस. एस. पंडित होते.
मुंबई येथील आशिष मिश्रा यांनी दुसऱ्या दिवशीच्या प्रथम सत्रात एग्रो केमिकल जनरेशन या विषयावरती ही माहिती विशद केली. प्रा. दीप्ती आगरकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. बाबासाहेब सलालकर हे होते. द्वितीय सत्रात अल्जेरिया येथून डॉ. दलीला हामांयचे यांनी बायोपोलिमर केमिस्ट्री या विषयावरती व्याख्यान दिले. मॅनचेस्टर विद्यापीठातील वैज्ञानिक डॉ. शशिकांत दिघे यांनी परिषदेच्या अंतिम सत्रात दूरदृश्यप्रणालीद्वारे मेडिसिनल केमिस्ट्री या विषयातील इनोवेशन व मेथोडोलॉजी याविषयी व्याख्याने दिले. सदर सत्राचे अध्यक्षस्थान प्रो. (डॉ.) एस. एस. घोलप यांनी भूषविले.
आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. मंत्री व विधानसभा सदस्य राधाकृष्ण विखे पाटील, माजी जि.प. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, युवा नेते खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वीतेसाठी रसायनशास्त्र विभागातील प्रो. (डाॅ.) एस. एस.घोलप, प्रो. (डॉ.) एस. एस. पंडित, प्रा. डॉ. बी. के.सलालकर, प्रा. डॉ. ए. एस. वाघमारे, प्रा. छाया कारले, प्रा. शरद शेळके, प्रा. सुधीर वाघे, प्रा. देविदास हारदे, प्रा. शरयू दिघे, प्रा. स्वाती कडू, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विविध समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.