अहिल्यानगर

लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांचा लोणी खुर्द ग्रामसभेत निषेधाचा ठराव सर्वानुमते मंजूर

ग्रामसभा निषेध ठरावाच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसुलमंत्री, पालकमंत्री, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक याच्यासह अ.नगर जिल्हा पोलीस प्रमुख यांना पाठवण्याच्या ग्रामसभेत एकमताने निर्णय 

लोणी प्रतिनिधी : देशाचे नेते महाराष्ट्राचे भाग्यविधाते शरदचंद्रजी पवार यांच्या राहुरी विद्यापीठ परतीच्या दौर्‍याच्या वेळी पवार यांच्या सुचनेवरुन लोणी खुर्द येथे वेताळबाबा चौकात नांदुर शिंगोटे- अ.नगर महामार्गावर सर्व नियमांचे पालन करुन कार्यकर्ते उभे असताना व्यक्तीद्वेषातुन गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच यांच्यासह इतर प्रतिष्ठित नागरिकांना आपमाणित केले. मोठमोठ्याने आरडाओरड करुन त्याच्या अंगावर काठी घेऊन धावून जाण्यापर्यत दहशत निर्माण केली गेली. एकप्रकारे या दौर्‍याला गालबोट लावण्याचा प्रयत्न लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी केला. शेवटी जाणता राजा शरदचंद्रजी पवार यांनी परिस्थितीचे भान ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांना तात्काळ लगाम घातला.
यामुळेच या दौर्‍यात उपस्थित असलेल्या गावातील नागरिकांकडून झालेल्या प्रकाराचा तिव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. दि. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी ग्रामपंचायत कार्यालय लोणी खुर्द येथे सरपंच जनार्दन घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत नागरिकांच्या संतापाला वाट मोकळी करण्यात आली. खा शरदचंद्रजी पवार यांच्या दौऱ्यात व्यक्तीद्वेषातुन गालबोट लावुन असभ्य वर्तन करणाऱ्या गावातील प्रथम नागरिकांसह इतर प्रतिष्ठित नागरिकांना आपमाणित करणाऱ्या व त्याच्यावर काठी घेऊन धावुन जाऊन मोठमोठ्याने आरडाओरड करुन दहशत निर्माण करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांचा निषेधाचा ठराव ग्रामसभेत घेवुन सर्वानुमते मंजुर करण्यात आला.

या ग्रामसभा निषेध ठरावाच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, महसुल मंत्री, पालकमंत्री, यांच्यासह महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, अ.नगर जिल्हा पोलीस प्रमुख यांना पाठवण्याच्या निर्णय ग्रामसभेने घेतला.

यावेळी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास आधिकारी यांच्यासह एकनाथ पा घोगरे, उत्तमराव आहेर, सुभाष आहेर, श्रीकांत मापारी, राजेंद्र घोगरे, सुनील आहेर, श्रीकिसन आहेर, आबासाहेब आहेर, नथुराम आहेर, विलास घोगरे, आप्पासाहेब घोगरे, आनिल आहेर, रणजित आहेर, दिलीप आहेर, दिपक घोगरे, कैलास आहेर, सचिन (मुन्ना) आहेर, बाळासाहेब आहेर, सुहास आहेर, जालिंदर मापारी, नासिर मनियार, मयुर आहेर, गौतम आहेर, संजय आहेर, सतिश आहेर यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button