अहिल्यानगर

उंदीरगाव ग्रामसभा खेळीमेळीत संपन्न

श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : तालुक्यातील उंदीरगाव येथील ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. आमचा गाव आमचा विकास उपक्रम अंतर्गत सन २०२२-२३ चा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रोहयो अंतर्गत कामाचा पुरवणी आराखडा तयार करणे, दलितवस्ती रस्त्याचे जातीयवादी नावे बदलून नवीन नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुभाष बोधक हे होते. यावेळी कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी माजी चेअरमन सुरेश गलांडे यांनी गावात घरपट्टी व पाणीपट्टी फार थकल्यामुळे ग्रामस्थांनी कर भरण्याचे आवाहन केले. ग्रामविकास अधिकारी हितेश ढूमणे यांनी एक विषय घेऊन ग्रामस्थांनी मत मांडावे अशी सूचना केली. यावेळी पेव्हिंग ब्लॉक रस्ता, शौचालय, स्ट्रीट लाईट या विषयी सविस्तर चर्चा झाली. राजेंद्र पाउलबुद्धे, जि.प.सदस्य बाळासाहेब नाईक, ख.विक्री संघाचे भाऊसाहेब बांद्रे, सुरेश ताके, दिलीप गलांडे यांनी विविध ठराव मांडले.

यावेळी कामगार तलाठी डहाळे, मुख्याध्यापक वारुळे, अंगणवाडी पर्यवेक्षक कासार, माजी सरपंच लक्ष्मणराव सरोदे, वैद्यकीय अधिकारी सुनील राजगुरू, प्रा सोपानराव नाईक, वीरेश गलांडे, उपसरपंच रमेश गायके, बबनराव नाईक, राजीव गिऱ्हे, ग्रा,प,सदस्य दीपक बोधक, प्रकाश ताके, चित्रसेन गलांडे, सी ए धीवर, आरोग्य सेविका आशा प्रतिभा वाघमारे, सुभाष गायकवाड आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Back to top button