वाळूज महानगरात ३०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारा
विलास लाटे/ पैठण : वाळूज महानगरात ३०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय तातडीने उभारावे अशी मागणी बुधवार, २७ ऑक्टोबर २०२१ रोजी अखिल भारतीय क्रांतीसेनेचे अध्यक्ष प्रा.संतोष तांबे, सरचिटणीस नितीन देशमुख यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करत मागणीचे निवेदन सादर केले.
दरम्यान या भेटीत उपजिल्हा रुग्णालयाची मागणी गरजेची का आहे. याबाबत क्रांतिसेनेचे सरचिटणीस नितीन देशमुख यांनी त्यांना माहिती सांगून या परिसराची सद्य परिस्थिती काय आहे हे सांगितले. तसेच यावेळी आरोग्य मंत्री टोपे यांनी याबाबत अधिकाऱ्यांना प्रस्ताव मागवण्याबाबत सूचना केली. यावेळी अखिल भारतीय क्रांतिसेनेचे अध्यक्ष संतोष तांबे पाटील, तालुका प्रमुख लक्ष्मण शेलार हे उपस्थित होते.
या निवेदनावर जिल्हा संपर्क प्रमुख साईनाथ कासोळे, क्रांतिसेनेचे वाळूज महानगर अध्यक्ष दिनेश दुधाट, जिल्हा संघटक राजू शेरे, वाळूज महानगर युवा अध्यक्ष औदुंबर देवडकर, वाळूज महानगर उपाध्यक्ष दीपक गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.