अहिल्यानगर
श्रीरामपूरात मुस्लिम ओबीसीचा जिल्हा मेळावा उत्साहात संपन्न
श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : श्रीरामपुरात ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनचा जिल्हा मेळावा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शब्बीर अहमद अंसारी होते तर प्रवक्ते म्हणून मौलाना मिर्झा अब्दुल कयूम नदवी होते.
कार्यक्रमाची प्रारंभिक हाफिज मुस्ताक यांनी पठण करून केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सूचना ॲड. हारून यासीन बागवान यांनी केली व अनुमोदन इब्राहीम युसूफ बागवान यांनी दिले. कार्यक्रमाची प्रस्तावना जाकीर उमर शाह यांनी केली. कार्यक्रमात नवीन पदाधिकारी यांचा सत्कार करून निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अन्सारी व जिल्हाध्यक्ष हाजीफय्याज हाजीचांद बागवान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी या पदग्रहण समारंभात जिल्हा सल्लागार म्हणून ॲड. हारून बागवान, जिल्हा उपाध्यक्ष दक्षिण सादिक साबुद्दिन शेख ( मुलानी) (कर्जत), राहुरी तालुका अध्यक्ष उबेदूर रहमान बागवान, राहुरी तालुका उपाध्यक्ष नूर मोहम्मद आतार, तालुका कार्याध्यक्ष नवेद इक्बाल बागवान, श्रीरामपूर सह सचिव शब्बीर नंहे कुरेशी, सह संघटक तालुका इसा आतार, तालुका सहसचिव सलिम आतार, श्रीरामपूर तालुका सहसचिव अफजल सुलेमान मंसुरी, तालुका खजिनदार अमीन नादर पिंजारी, तालुका सह संघटक समीर इस्माईल पिंजारी, दक्षिण तालुका अध्यक्ष कर्जत सलिम लतिफ आतार कर्जत, तालुका संघटक सोनू बागवान, राहाता तालुकाध्यक्ष शौकत हिराजी तांबोळी, राहता तालुका उपाध्यक्ष इब्राहिम नवाब शहा या पद ग्रहण समारंभात यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी, मौलाना अब्दुल कयूम नदवी, श्रीरामपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष करण ससाणे, साई संस्थानचे विश्वस्त सचिन भाऊ गुजर, नाशिक जिल्हाध्यक्ष तन्वीर खान तंबोली, नाशिक समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष रफीक सय्यद, शहराध्यक्ष इमरान चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमात संगमनेर माजी उपनगराध्यक्ष शफी तांबोळी, माजी नगरसेवक शकील पेंटर, साबीर कुरेशी, समाजवादीचे राजू खान, शिरील अभंग, इमरान मिर्झा, येवलाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अतीक गाजी, शहराध्यक्ष दादाभाई शेख, गरीब नवाज फाऊंडेशनचे अध्यक्ष व श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक मुख्तारभाई शाह, बागवान समाजाचे अजिजभाई बागवान, प्राध्यापक उमर बागवान, साहित्यिक मीरा बक्ष बागवान, छप्परबंद संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शाह, काकर समाजाचे शहराध्यक्ष इस्माईल काकर चौधरी, समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोयफ जमादार, मिल्लत सोसायटीचे अध्यक्ष सलाउद्दीनभाई शेख, हनीफ तांबोळी, मुश्ताक तांबोळी, साबिर शहा, काँग्रेस तालुका सचिव जाफर शहा, जमील काकर, याकूबभाई कुरेशी, खाटीक समजाचे अध्यक्ष इलाही बक्श कुरेशी, एम आय एम चे जिल्हा सहसचिव फय्याज कुरेशी, शहराध्यक्ष शहाबाज शेख, मुबीन हुसेन बागवान, आयाज हाजी रियाज बागवान, अमीन शाह, बिलालशाह, अकबर पठाण, अत्तार समाजाचे इसाकभाई आतार, बीजेपी अल्पसंख्यांक शहराध्यक्ष साजिद शेख, रवी पंडित उपस्थित होते व सर्व समाजाचे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हा उपाध्यक्ष व काकर समाजाचे प्रदेशाध्यक्ष इक्बाल इस्माईल काकर यांनी यशस्वीरित्या सूत्रसंचालन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष हाजी फय्याज हाजी चांद बागवान, जिल्हा उपाध्यक्ष इक्बाल काकर, जिल्हा सचिव इब्राहिम युसूफ बागवान, जिल्हा संघटक जाकीर उमर शाह, सहसचिव अजिजभाई आतार, अध्यक्ष आरिफ कुरेशी खाटीक, तालुका उपाध्यक्ष फय्याज मुलानी, कार्याध्यक्ष आरिफ काकर, तालुका सचिव अतीक तांबोळी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार गरीब नवाज फाऊंडेशनचे अध्यक्ष व श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक मुक्तार भाई शाह यांनी केले.