अहिल्यानगर
जन आधार सामाजिक संघटनेची कार्यकारिणी जाहीर
समाजामध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी जनाधार संघटना खंबीरपणे उभी – प्रकाश पोटे
राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : जन आधार सामाजिक संघटनेची नुकतीच कार्यकारणी जाहीर करण्यात आली. जनाधार सामाजिक संघटनेचे यापूर्वीच काम धर्मनिरपेक्ष, राजनीती विहिरीत आहे, ही संघटना सर्व सामान्य लोकांनी एकत्र येऊन उभा केलेली जनाधार संघटना असल्याने, यापुढेही जनसामान्यांसाठी हा लढा अविरतपणे निर्भीडपणे असाच सुरू ठेवला जाणार असून, समाजामध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी जन आधार सामाजिक संघटना ही नेहमी जनसामान्यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याची भावना यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी सांगितले. तर नूतन पदाधिकाऱ्यांचे पत्र देऊन निवड करण्यात आली.
यामध्ये प्रदेश कार्यकारिणीवर संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, राज्य उपाध्यक्ष दीपक गुगळे, महाराष्ट्र राज्य सचिव अमित गांधी, संपर्कप्रमुख अजय सोलंकी, अजित वाढेकर, डॉ.सुरेश आरले, राजू लांडे, बाबासाहेब करांडे, महिला अध्यक्ष मंगल मोरे, युवक अध्यक्ष गणेश निमसे यांची निवड करण्यात आली. अहमदनगर जिल्हा प्रमुख पदी अमोल भंडारे, अहमदनगर जिल्हा युवक अध्यक्षपदी गौतम सातपुते, शहराध्यक्षपदी शहनवाज शेख, शहर युवक अध्यक्षपदी शहाबाज शेख तर कार्याध्यक्ष श्रीपाद वाघमारे, बाळासाहेब केदारे, सचिव संतोष उदमले, कार्याध्यक्ष वसीम शेख, सचिव किरण जावळे, संपर्कप्रमुख बंडू दहातोंडे, अविनाश काळे, सुशील नहार, सुरेश अंधारे, संतोष टेमक, रावसाहेब वरपे, सौ.मंगल पालवे, रोहन परदेशी, सादिक शेख, किरण गाढवे, निलेश सातपुते, सुशील साळवे, राजा भाऊ साठे, गौरव भंडागे, हरिदास भवार, संतोष त्रंबके, संदीप तेलधुने, रत्नाकर साठे, शाहिद सय्यद, फारुक शेख, रोहिदास उमाप, आदेश शिरोळे, अमोल डोळस, शिवा म्हस्के, एम.के.पठाण, सचिन फल्ले, , मच्छिंद्र गांगर्डे यांची निवड करून निवडीचे पत्र देण्यात आले.
पुढे बोलताना पोटे म्हणाले की संघटनेच्या माध्यमाने अनेकांचे प्रश्न सोडविण्यात आलेले असून अनेक आंदोलने, मोर्चे, रास्ता रोको करून प्रश्न सोडवण्यात आले असल्याचे पोटे यांनी व्यक्त केले. तसेच निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन, जिथे कुठेही गोरगरीब जनतेची पिळवणूक होत असेल तेथे संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचे सांगितले. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.