महाराष्ट्र
देवळालीच्या चित्रकाराचे राज्यपालांकडून कौतुक
मुंबई : देवळाली प्रवराचे सुपुत्र तथा मुंबई मधील प्रथितयश चित्रकार आसिफ शरीफ शेख यांनी २३ ऑक्टोबर रोजी राज्यातील चित्रकारांच्या अडचणी व त्यावरील उपाय बाबत मुंबई येथील राजभवन मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली.
प्रसंगी आसिफ शेख यांनी स्वतः निर्माण केलेला चित्रांचा कॅटलॉग राज्यपालांना भेट दिला असता राज्यपालांनी आसिफ शेख यांनी निर्माण केलेल्या चित्रांचे कौतुक केले.