अहिल्यानगर
श्रीरामपुरात रविवारी ओबीसीचा जिल्हा मेळावा
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : येथील ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने जिल्हा मेळावा व मार्गदर्शन व पदग्रहण सोहळा रविवार दि. २४ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी ०२:०० वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी मंगल कार्यालय संगमनेर रोड बाजारतळ श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
ह्या जिल्हा मेळाव्याचे अध्यक्षपदी व प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अहमद अंसारी उपस्थित राहणार आहे. तसेच ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे प्रमुख प्रवक्ते मौलाना मिर्झा अब्दुल कयूम नदवी मार्गदर्शन करणार आहेत. तरी या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार लहुजी कानडे, नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, श्री साईबाबा संस्थान शिर्डी चे विश्वस्त सचिन गुजर, ओबीसीचे जिल्हाध्यक्ष प्रा. मोहम्मद रफिक बागवान, नाशिक जिल्हाध्यक्ष तन्वीर खान तांबोळी, संगमनेरचे हाजी शफी भाई तांबोळी, गरीब नवाज फाउंडेशन श्रीरामपूरचे संस्थापक अध्यक्ष मुक्तारभाई शाह उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात जिल्हा भरातून ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी तसेच मान्यवर व नवीन पदाधिकारी यांचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांच्या हस्ते पदग्रहण समारंभ होणार आहे. तरी जिल्हाभरातील सर्व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष हाजी फय्याज भाई बागवान, जिल्हा उपाध्यक्ष काकर इक्बाल इस्माईल, जिल्हा संघटक जाकीर भाई शाह, जिल्हा सचिव इब्राहीम युसूफ बागवान, जिल्हा सह सचिव अजीज भाई अत्तार, जिल्हा कार्याध्यक्ष आरिफभाई कुरेशी खाटीक, हाफिस युनूस जमादार, जिल्हा सल्लागार ॲड. हारून यासीन बागवान, उपाध्यक्ष फय्याजभाई मुलाणी, कार्याध्यक्ष आरिफ काकर, तालुका संघटक अझहर जहागीरदार, तालुका सहसंघटक शरीफ शेख, तालुका सचिव अतिक हनीफ तांबोळी, तालुका सहसचिव एजाज शाह यांनी केले आहे.