अहिल्यानगर

२४ ऑक्टोबर रोजी शेवगाव येथे एस टी कामगारांचा विभागीय मेळावा

श्रीरामपूर [बाबासाहेब चेडे] : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने दि. २४ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता शेवगाव येथे साई लॉन्स सह्याद्री हॉटेलजवळ शेवगाव पाथर्डी रोड या ठिकाणी एसटी कामगारांचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यास प्रमुख अतिथी चेअरमन ज्ञानेश्वर स.साखर कारखाना भेंडा, केंद्रीय अध्यक्ष एसटी कामगार संघटना मुंबई संदीप शिंदे, मार्गदर्शक जनरल सेक्रेटरी हनुमंतराव ताटे तसेच कार्यक्रमास जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस आ.चंद्रशेखर घुले, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रतापराव ढाकणे, विधिज्ञ शिवाजीराव काकडे, सभापती दिलीपराव लांडे, हर्षदाताई काकडे, अरुणभाऊ मुंढे, गोकुळ दौंड, किसनराव चव्हाण, रणजीत वेळगे, क्षितीज घुले, अमोल फडके, बाळासाहेब फटांगरे, संजय नागरे, माधवराव काटे, विजयराव देशमुख, अशोक आहुजा, सागर फडके, दत्तात्रय फुंदे, संजुभाऊ फडके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण बाबत संघटनेची स्पष्ट भूमिका व त्याबाबतचा निर्णय, थकीत १६ टक्के महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतन वाढीचा दर, ग्रेड पे तफावत दूर करून फरकाबाबतची भूमिका, प्रलंबित वेतन करार या बाबतची भूमिका व त्यामधील फरकाबाबत संघटनेची कारवाई व पुढील दिशा, जाहीर ४८५९ कोटी रुपयातील उर्वरित रक्कमेचा वाटपाबाबत संघटनेच्या लढयाबाबतची भूमिका, एसटी महामंडळ कामगारांवर ओढवलेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी संघटनेची पुढील ध्येय धोरणे निश्चिती, सेवानिवृत्त कर्मचारी प्रलंबित देयके, पेन्शनवाढ, मृत कर्मचारी यांच्या पत्नीस वय ७५ पर्यंत मोफत पास देणे, प्रलंबित वैद्यकीय बिल देयके त्वरित आदा करणे, तसेच कॅशलेस मेडिक्लेम योजना कार्यन्वित करणे बाबत भूमिका, कोविड १९ आजाराने जे रा. प. कर्मचारी मयत झाले अशा कर्मचारी यांना विमाकवच व राप रक्कम अदा करून वारसास तत्काळ नोकरी देणे आदी विषयावर मेळाव्यात चर्चा व निर्णय घेण्यात येतील.

या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन शेवगाव आगार संजय धनवडे, दिलीप लबडे, ज्ञानदेव अकोलकर, शिवाजीराव कडूस, उत्तम रणसिंग, रोहिदास अडसूळ, दत्तात्रय चितळे, बलभीम कुबडे आदी पदाधिकारी व सभासदांनी केले आहे.

Related Articles

Back to top button