कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये फळ प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन

राहुरी विद्यापीठशासन हे सरकारी-खाजगी भागीदारीसाठी प्रोत्साहन देते. या अनुषंगाने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील काढणी पश्चात तंत्रज्ञान केंद्र हे सरकारी-खाजगी भागीदारीद्वारे भाडेतत्वावर लिलियम फुडस् प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला चालविण्यास दिले आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


या केंद्रातून चिंच, पेरु, आंबा, आवळा या फळांचे ज्यूस उत्पादन सुरु झाले. यावेळी संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, सहयोगी अधिष्ठाता (निकृशि) डॉ. श्रीमंत रणपिसे, कुलसचिव श्री. प्रमोद लहाळे, श्री. सुरेशराव शेटेे, डॉ. सुनिल गोरंटीवार, डॉ. सचिन नलावडे, डॉ. कैलास कांबळे, डॉ. विक्रम कड उपस्थित होते.

कुलगुरु डॉ. पाटील यावेळी म्हणाले आपल्या राज्यातील हवामान विविध फळे व भाजीपाला उत्पादनासाठी अनुकुल आहे. शेतकर्यांचा भाजीपाला तसेच फळे यांच्या हाताळणीमध्ये, वाहतूकीमध्ये तसेच साठवणुक करतांना फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हेच नुकसान टाळायचे असेल तर त्यावर प्रक्रिया करणे हाच चांगला पर्याय आहे. फळ प्रक्रिया पदार्थांना राज्यातच नव्हे तर देशात तसेच परदेशातही मोठी मागणी आहे. यावेळी लिलियम फुडस् प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक सुरेशराव शेटे म्हणाले या केंद्रातून विविध फळे, भाजीपाल्याचे, प्रक्रियायुक्त पदार्थ तसेच ज्यूस, सरबत, सीरफ, स्क्वॅश, जाम, कँन्डी असे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यात येणार आहेत.

Related Articles

Back to top button