अहिल्यानगर
तालुक्याच्या विकासासाठी कटीबद्ध- शेलार
श्रीगोंदा प्रतिनिधी/सुभाष दरेकर : गेली अनेक वर्षांपासून तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न मंत्रालय दरबारी धुळ खात पडुन होते. श्री काशिविश्वनाथ देवस्थान ट्रस्ट ढोरजा येथील मंदिर रस्ता मंजूर करण्यात आल्याने हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने तालुक्याच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन घनःशाम आण्णा शेलार यांनी व्यक्त केले आहे.
साधारण रस्ता कामासाठी ९ कोटींचा निधी ग्रामविकास मंत्री तसेच अहमदनगर जिल्हाचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी मंजुर केला आहे. त्याचबरोबर देवस्थान च्या कामाचा उर्वरित निधीही साधरण निधी रक्कम ४ कोटी ५५ लाख मंजूर करण्यात आला. पुढील एक महिन्यामध्ये सदरील कामाची सुरुवात होईल, असे आश्वासन मंत्री उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती सुनील तटकरे यांनी दिले.
या कामात मोलाची मदत करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम आण्णा शेलार यांनी सतत पाठपुरावा करून अखेर मंजुरी मिळवून तालुक्याच्या विकास कामात मोलाचे योगदान दिले. तसेच याप्रसंगी देवस्थानच्या कामात सतत तत्पर असणारे देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व विश्वस्त मंडळाने घनःशाम शेलार यांचे आभार मानले. आज घनश्याम आण्णा शेलार यांनी मुंबई येथे मंत्रालयात ना. मंत्री आदित्य तटकरे यांच्या बरोबर चर्चा करून तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लावले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम आण्णा शेलार, देवस्थानचे अध्यक्ष सोन्याबापु वाणी, देवस्थानचे उपाध्यक्ष नानासाहेब रनसिंग, विश्वस्त शरदराव वाणी पाटील, दादासाहेब व्यवहारे पाटील, संदिप ढोरजकर, संजय ढोरजकर हे उपस्थित होते. त्याबद्दल गावातील ग्रामस्थ व परिसरातील भक्त आनंद व्यक्त करीत आहेत. अशाच पद्धतीने विकासाच्या कामासाठी आमदार नसले तरी सर्व सामान्य जनतेच्या मनातील आमदार असणारे घनःशाम आण्णा शेलार यांच्या कामाचे कौतुक सर्वत्र होत आहे.