अहिल्यानगर
देवळाली प्रवरा नगरपरिषद परिपुर्ण करा; मुख्याधिकारी नेहा भोसले यांना वृक्ष देऊन हेल्प टीमचे साकडे
देवळाली प्रवरा : येथील नगरपरिषदच्या मुख्याधिकारी पदाचा नव्याने पदभार स्विकारलेल्या IAS नेहा भोसले यांचे देवळाली हेल्प टीमच्या वतीने वृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आले व देवळाली प्रवरा नगरपरिषद परिपुर्ण करण्याचे दृष्टीने निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले.
या प्रसंगी हेल्प टीमचे माजी सनदी अधिकारी दत्तात्रय कडू पाटील, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे, सागर सोनवणे, ऋषिकेश संसारे, शंकर धोत्रे आदी कोअर कमिटी सदस्य हजर होते. प्रसंगी रजेवर असलेले मुख्याधिकारी अजित निकत हे सुद्धा हजर होते.
देवळाली प्रवरा हेल्प टीमच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेहा भोसले यांच्या प्रशासकिय सेवेची सुरुवात देवळाली प्रवरा नगररिषदेपासुन होत असल्याने हेल्प टीमच्या वतीने वृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आले. देवळाली प्रवरा नगरपरिषदेचा राज्यात प्रथम क्रमांकाचा म्हणुन जरी नावलौकिक असला तरी नगरपरिषद हि सर्वार्थाने परिपुर्ण नसल्याचे वास्तव नाकारतां येणार नाही. नगरपरिषदेचे मुळ कर्तव्ये आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच प्राथमिक शिक्षण हि आहेत. आपण जर पाहिलेत तर यात आरोग्य व प्राथमीक शिक्षण ह्या दोन मुलभुत बाबी अद्यापहि नगरपरिषदेने ताब्यात घेतलेल्या नाहीत. नगरपालिका स्थापन होवुन जवळपास काही दशके लोटली परंतु या गोष्टींवर कुणीहि काम केले नाही. आर्थिक परिस्थिती यांस कारणीभुत सांगितली जाते. जर नगरपरिषदेचे हि मुलभुत दोन कर्तेव्ये जर पार पाडली जात नसतील, त्यातुन नागरिकांस दर्जेदार आरोग्यसेवा व मुलांना कसदार प्राथमिक शिक्षण मिळत नसेल तर काय उपयोग. कोरोनाचे दुस-या लाटेत फार भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. जवळपास १००० लोक संसंर्गीत झाले. तसेच ६० मृत्युमुखी पडले. या शहरात एकही एमबीबीएस तसेच तज्ञ डॅाक्टर नाही. नगरपालिकेचे रुग्णालय नाही. अश्यावेळी नागरिकांची होत असलेली परवड खुप विदारक होते. दर्जेदार शिक्षणाचे महत्व आपण जाणता, प्राथमीक शिक्षण नगरपरिषदेने ताब्यात घेतले तर मुलांचा पाया पक्का होईल. जिल्हा परिषदेकडील या दोन्ही सेवा नगरपरिषदेकडे हस्तांतरित करुन नगरपरिषद परिपुर्ण करण्यासाठी आपल्या सारख्या उच्च विद्याविभुषीत सनदी अधिका-याने लक्ष द्यावे.
या शहराची ७० टक्के लोकसंख्या हि शेतावर वाड्या वस्त्यांवर राहाते. स्वच्छता हा विषय त्यांचा ते हाताळत असतात. नगरपरिषद केवळ ३० टक्के लोकसंख्येस हि सुविधा देत आहेत, स्वच्छेसाठी आवश्यक असलेल्या सर्व पायाभुत सुविधा नगरपरिषदेकडे आहेत. केवळ थोडेफार मनुष्यबळ कमी पडते. ते कंत्राटीपध्दतीने उपलब्ध करुन घेतल्यास यावर होणा-या खर्चात १ करोड रुपयाची बचत होवु शकते. त्यातुन आरोग्य न् प्राथमीक शिक्षण या सुविधा देता येतील. या शहरात मागासवर्गीय व आदिवासी समाजाची संख्या लक्षणीय आहे. नगरपरिषद झाल्याने या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या वैयक्तीक लाभाच्या योजनांपासुन वंचित रहावे लागत आहे. त्यासाठी नगरपरिषद स्तरावर या घटकांसाठी विशेष घटक योजना तयार करुन त्यांस नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकात अनिवार्य तरतुद करुन वैयक्तीक लाभाच्या योजना राबवाव्यात. या गावातील युवती व महिला यांचे शिक्षण, आरोग्य रोजगार हे अंत्यत दुर्लक्षित विषय आहेत. या घटकांसाठी आपण एक कालबध्द व नियोजनबध्द कार्यक्रम आखावा. या शहरातील ८० ते ९० टक्के महिलांचा हिमोग्वोबिन स्तर आवश्यकतेपेक्षा खुपच कमी आहे. हि खुप चिंताजनक बाब आहे. या घटकांच्या मार्गदर्शक व आदर्श बनुन यांचे मुलभुत प्रश्न सोडविण्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करावा. देवळाली प्रवरा हेल्प टीम हि कोरोनाच्या दुस-या लाटेत तयार झालेली टीम असुन यात उच्चशिक्षित व्यक्ती असुन निरपेक्ष भावनेने ते काम करत आहेत. देवळाली प्रवरा येथे क्रीडा संकुल तसेच ग्रामीण रुग्णालय उभारणेबाबत शासकीय जागा उपलब्ध करुन घेणेबाबत आम्ही पाठपुरावा सुरु केला आहे. आपणही त्यात लक्ष द्यावे. केवळ एका निरपेक्ष भावनेने आपल्याकडे वरिल मागण्या केल्या आहेत. त्या आपण मार्गी लावाल अशी अपेक्षा हेल्प टीमने व्यक्त केली आहे.