अहिल्यानगर

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीकडून चुलीवर भाकरी भाजुन केंद्र सरकारचा निषेध

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : केंद्र सरकारने वाढविलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमती त्वरित कमी कराव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर चुलीवर भाकरी भाजुन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे. या अनोखे आंदोलन डॉ उषाताई तनपुरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यावेळी सोनवणे बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष अनिल कासार, तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबा भिटे, पंचायत समितीचे गट नेते रवींद्र आढाव आदी प्रमुख उपस्थित होते.


आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर निच्चांकी असताना त्यांचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही. वास्तविक पाहता राष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीचा विचार करून देशांतर्गत इंधनाचे दर ठरविले असताना सध्या ती पारदर्शकता केंद्र सरकारमध्ये राहिलेली नाही. केवळ निवडणुकीपर्यंत देखावा करायचा आणि त्याच्या राज्यात निवडणुका लागल्या की पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडर दरवाढ नियंत्रित करायची व निवडणुका संपल्या की पुन्हा जैसे थे परत करायची आणि आपल्या आश्वासनांचा विसर सोडून जनतेला वाऱ्यावर सोडायचे. या केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करत महिला पदाधिकाऱ्यांनी तहसील कचेरी समोर चुलीवर भाकरी भाजून केंद्र सरकारचा निषेध केला.
यावेळी नगराध्यक्ष अनिल कासार, मच्छिद्र सोनवणे, डाॅ.प्रसाद बानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे, नवाज देशमुख, अप्पासाहेब जाधव आदींनी भाषण करत केंद्र सरकारवर टीका केली. आंदोलनकर्त्यांच्या वतीने नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षक ह्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिलांनी तहसील कार्यालयासमोर चुलीवर भाकरी भाजुन केंद्र सरकारचा निषेध केला.
या आंदोलनात बाळासाहेब गाडे, माजी सरपंच प्रभाकर गाडे, बाबा कल्हापुरे, आयुब शेख, भारत भुजाडी , ॲड. राहुल शेटे, ॲड. भानुदास नवले, ॲड. ऋषीकेश मोरे, जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुरेश निमसे, बाबासाहेब खुळे, तालुका उपाध्यक्ष सलीमभाई शेख, जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष नितिन बाफना, नंदकुमार गागरे, राजेंद्र बोरकर, नंदकुमार तनपुरे, सूर्यकांत भुजाडी, शहराध्यक्ष संतोष आघाव, महिला तालुकाध्यक्ष शारदा खुळे, तृप्ती येवले, माजी सभापती सुनीता निमसे, माजी सभापती मनीषा ओहळ, महिला अध्यक्ष अपर्णा ढमाळ, नगरसेविका संगीता आहेर, राधा साळवे, ज्योती तनपुरे, मुक्ता करपे, दशरथ पोपलघट, संजय साळवे, विलास तनपुरे, प्रकाश भुजाडी, शहाजी जाधव, सुनील अडसूरे, अण्णासाहेब बाचकर, अय्युबभाई पठाण, महेश चुत्तर, ओबीसी सेलचे अध्यक्ष महेश उदावंत, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष ओंकार कासार, अक्षय सांगळे, युवराज चव्हाण, अण्णासाहेब सोडणार, प्रदीप पवार, बाळासाहेब लटके आदिंसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Articles

Back to top button