अहिल्यानगर
फटाका स्टॉल धारकांना रीतसर निविदा प्रसिद्ध करून जागा उपलब्ध करून देण्याची शिवसेनेची मागणी
फटाका स्टॉल धारकांना रीतसर निविदा प्रसिद्ध करून जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात मागणीचे निवेदन देताना तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे व कार्यकर्त…
श्रीगोंदा प्रतिनिधी/सुभाष दरेकर : फटाका स्टॉल उभारणे कामी रीतसर वर्तमानपत्र व दवंडी द्वारे जाहीर निविदा प्रसिद्ध करून जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुख्य अधिकारी मंगेश देवरे यांना शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
श्रीगोंदा शहरात नगरपालिका हद्दीमध्ये दरवर्षी दिवाळीनिमित्त
बाजारतळ येथे फटाके स्टॉल उभारणे कामे नगरपालिका मार्फत जागा उपलब्ध करून दिली जाते. फटाके स्टॉल साठी जागा देताना पालिकेमार्फत कोणत्याही प्रकारे पारदर्शीपणा न वापरता नेहमीच्या हितसंबंध येतील लोकांची जागा फटाके स्टॉल उभारण्यासाठी दिली जाते. या प्रक्रियांमध्ये अनियमितता दिसून येत आहे. सदर परवाना देताना कोणतीही कागदपत्राची शहानिशा केली जात नाही. वास्तविक फटाके स्टॉल उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देताना पालिकेने रीतसर जाहीरपणे वर्तमानपत्राद्वारे अथवा दवंडी द्वारे जागा मालकाकडून निविदा मागणी करून नगरपालिकेच्या नियमाप्रमाणे प्राप्त झालेल्या निविदा मधून पालिकेला महसूल मिळेल अशा निविदेचा विचार करून जागा मालकाला त्याच्या जागेमध्ये फटाका स्टॉल धारकांना उभारणे कामी परवानगी देणे आवश्यक आहे. परंतु रीतसर प्रक्रियेचा अवलंब फटाके स्टॉल देत असताना होत नाहीत असे निदर्शनात आले आहे. या जागेवर श्रीगोंदा नगर परिषदेचे आठवडा बाजारासाठी आरक्षण आहे. तरी या जागेवर पालिकेचा अधिकार आहे. याच्या भाडे पोटी खाजगी मालक भाडे घेऊन पैसे कमवत आहे. पालिकेने ही जागा सदर 15 दिवसांसाठी ताब्यात घेऊन पालिकेला कशाप्रकारे महसूल मिळेल याची दक्षता घेऊन कारवाई करावी, नाहीतर अन्य ठिकाणी फटाका स्टॉल धारकांना जागा उपलब्ध करून देण्यात यावी. यावर लवकरच कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र स्वरूपाची आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे, शिवसेना उपतालुका प्रमुख सुरेश देशमुख, युवासेना मा तालुका प्रमुख हरिभाऊ काळे, युवासेना तालुका प्रमुख निलेश गोरे, महिला आघाडी तालुकाप्रमुख मनिषाताई काळे, युवासेना शहर प्रमुख ओमकार शिंदे, युवासेना उपशहर प्रमुख जयराज गोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.