अहिल्यानगर
स्वामीराज कुलथे यांच्यासारखे युवा पत्रकार हेच समाजाचे खरे कैवारी होय-डॉ. रामचंद्र जाधव
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : स्वामीराज प्रकाश कुलथे यांना भूमी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय युवा पत्रकार पुरस्कार घोषित झाला हे कौतुकास्पद आहे.स्वामीराज कुलथे यांच्यासारखे जागृत, अभ्यासू आणि समाजप्रेमी असलेले युवा पत्रकार हेच समाजाचे कैवारी असल्याचे विचार माजी शिक्षण उपसंचालक डॉ. रामचंद्र जाधव यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात दैनिक स्नेहप्रकाशचे कार्यकारी संपादक स्वामीराज कुलथे यांना युवा पत्रकार पुरस्कार घोषित झाल्याबद्दल डॉ. रामचंद्र जाधव यांनी आपल्या मित्रपरिवार समवेत सत्कार केला, त्याप्रसंगी डॉ. रामचंद्र जाधव बोलत होते. प्रारंभी साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी भूमी फाऊंडेशन, प्रा. कैलास पवार यांच्या सामाजिक कार्याची माहिती देऊन कुलथे परिवार आणि पत्रकारिता यांचे सविस्तर विवेचन केले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.डॉ. रामचंद्र जाधव म्हणाले, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची खरी क्षमता ही पत्रकार आणि साहित्यकार यांच्यात आहे, आपण श्रीरामपुरात पत्रकार आणि साहित्यकांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहोत, श्रीरामपूर ही माझी कर्मभूमी, सेवाभूमी असून या भागात टिळकनगर आणि परिसरात बालपण गेले माझे हजारो मित्रपरिवार आणि माजी विद्यार्थी स्नेहग्रुप मंडळ सेवाभावाने कार्य करीत आहोत,असे सांगून श्रीरामपूरातील पत्रकार आणि साहित्यिकाच्या कार्याचा अभिमान व्यक्त केला.डॉ. बाबुराव उपाध्ये यांची वाचन संस्कृती चळवळ ही भूषणववह आहे, त्यांना मिळालेला “श्रीरामपूर भूषण पुरस्कार “योग्य असल्याचे गौरवाद्गार काढून स्वामीराज कुलथे, पत्रकार प्रकाश कुलथे, सौ. स्नेहलता कुलथे यांच्या योगदाबद्दल विचार मांडले. स्वामीराज कुलथे यांनी डॉ. रामचंद्र जाधव यांच्यासारख्या अनुभवशील शिक्षणतज्ञ व्यक्तीने सन्मान केला, त्याबद्दल आभार मानले.