अवैध दारू विक्री करणाऱ्या पाच वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांची कारवाई
विजय चिडे/पाचोड : येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच वेगवेगळ्या ठिकाणी दारूची अवैध विक्री होत असल्याची माहिती पाचोड पोलिसांना (दि.२) रोजी दुपारच्या सुमारास मिळाली असता त्यांनी त्याठिकाणी जावून दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई करून ताब्यात घेतले असुन चौतीस हजार आठशे रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील एकतूनी तांडा येथे रमेश खेमा पवार यांच्याकडे अवैधरित्या देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी एकतुनी तांडा येथील त्यांच्या घरी धाड टाकली असता सदर ठिकाणी १० देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या तर दुसरीकडे आडुळ येथील विनोद दादाराव शेलार याच्याकडे २० देशी दारू बाटल्या मिळाल्या तर नांदर येथील रामेश्वर प्रभाकर मोरे याच्याकडं १२ देशी दारुच्या बाटल्या सापडल्या तर चौथ्या ठिकाणी कडेठाण येथील रामभाऊ बाबूराव गायकवाड यांच्या कडे २६ बाटल्या मिळून आल्या आहे तर पाचव्या ठिकाणी तालुक्यातील रोहीदारनगर येथील यश राम भवर यांच्याकडे एक सिंलबद देशी दारुचे बाँक्स सापडले असून एक शाईन गाडी देखील पोलिसांनी जप्त केली.
सदरील कारवाईमध्ये ३४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याची नोंद पाचोड पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदवून या अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलिस कर्मचारी जगन्नाथ उबाळे, तात्यासाहेब गोपालघरे, पवन चव्हाण, फेरोझ बर्डे, विलास पगारे, आव्हाड ,जीवन गुडेकर आदींचा सहभाग होता.