छत्रपती संभाजीनगर

पाचोडचा आठवडी बाजार आठ महिन्यांनी सुरू

 
विजय चिडे/पाचोड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेला पैठण तालुक्यातील पाचोड येथील आठवडी बाजार रविवारी (दि.१७) पासून सुरू झाला आहे. बाजार सुरू झाल्याने शेतकरी, व्यापारी, लहान मोठे दुकानदारासह खरेदीदारांत आनंदाचे वातावरण पाहायला  मिळाले.

पैठण तालुक्यामधील पाचोड येथील आठवडी बाजार मराठवाड्यातील सर्वात मोठी बाजार पेठ असून या बाजारामध्ये लाखोंची उलाढाल होत असते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये हा बाजार बंद करण्यात आला होता. बाजार बंद झाल्याने बैलजोडी, शेळ्यांचे बाजारभाव पडल्याने नागरिकांची पिळवणूक होऊन मोठी गैरसोय निर्माण झाली होती. पाचोड येथील बाजाराशी परिसरातील ३० ते ४० खेड्यांशी संबंध येऊन व्यवहार होत असतात. या बाजारांमध्ये धान्य खरेदी पासून शेळी खरेदी-विक्री बैलजोडी खरेदी विक्री अशा सर्व प्रकारची विक्री खरेदी होत असते. 

परंतु या सर्वावर कोरोणाच्या दुसऱ्या लाटेमुळे संकट निर्माण झाले होते. त्यामुळे बाजार बंद करण्यात आला होता. परंतु रुग्ण संख्या आटोक्यात आल्याने राज्य सरकारने टप्प्याने सर्वशाळा, मंदिरे, मॉल व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिल्याने पाचोड बाजारही पूर्ववत सुरू झाला असून, बाजार सुरु झाल्याने नागरिकांना आनंद झाला असून आता शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळून जनावरेही खरेदी विक्री सुरू झाली आहे.

बाजारात कांद्याची आवक कमी असल्याने कांद्याने प्रतिकिलोला ५० ते ६० रुपये भाव खाल्ला आहे. पावसामुळे यंदा नगदी पिकांच्या शेतीला मोठा फटका बसला. त्यात सर्वाधिक नुकसान कांद्यांचे झाले. अशात उन्हाळी कांद्याचा साठा संपत आला असून, नवीन पीक पुरेशा प्रमाणात आलेले नाही. यामुळे सर्वत्र कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. बाजारात फळभाज्यांची आवक वाढली आहे. मात्र, काही भाज्यांच्या मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने फ्लॉवर, कोबी, शेवगा, गाजर, बीट, स्वस्त आहे, तर वांगी प्रतिकिलो ४० रुपये, कारले ४०, टोमॅटो ४०, काकडी २०, बटाटा २० ते २५, वाटाणा ३०, तर कोबी १० रुपये किलो, तर फ्लॉवर पाच रुपयांपासून ते १० रुपये किलोप्रमाणे मिळत होते. तेजीत असलेल्या पालेभाज्यांचे दर स्थिर होते.

कोरोणामुळे सर्वत्र आठवाडी बाजार बंद होते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आपला कोबी अक्षरश:शेतातच फेकून दिली. भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. आठवडी बाजार बंद झाल्यापासून बेकारी झाली होती, आज आठवडे बाजार सुरू झाल्याने समाधान वाटले. शेतकऱ्यांकडून भाजीपाला विकत घेऊन सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत विकले आहे.

    –रुख्मिनीबाई जाधव, भाजी पाला विक्रेत्या.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button