छत्रपती संभाजीनगर
ढोरकीन येथील भवानी मातेचे शेकडो भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन
विलास लाटे/पैठण : तालुक्यातील ढोरकीन सह पंचक्रोशीतील गावांच्या हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ढोरकीन येथील माळरानावर ढोरकीन लोहगाव रस्त्यावरील भवानी मातेचे विजया दशमीच्या पावन पर्वावर हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.
ढोरकीन गावापासून जवळपास साडेतीन ते चार किलोमीटर अंतरावर गावाच्या पश्चिमेस भवानी मातेचे प्राचिन मंदिर आहे. याठिकाणी ढोरकीनसह परिसरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. या मंदिराचे आता नवीन बांधकाम करुण सुशोभन करण्यात आले आहे. काल विजयादशमी निमित्त शुक्रवारी सकाळपासून रात्री उशीरपर्यंत मंदिरात पुजा अर्चना सुरू होती. वर्तमान व भविष्यकाळात मानवी जीवनातील असंख्य प्रश्न, अडचणी व समस्या समूळ नष्ट होऊ दे आशि अर्त साद भवानी मातेचरणी भाविकांनी केली.