महाराष्ट्र
राष्ट्रीय संघर्ष समितीचा मावळ येथे तालुकास्तरीय पेन्शनर्सचा मेळावा
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पेन्शनर्सचा मेळावा बुधवार दि. १३ ऑक्टोबर २०११ रोजी दुपारी १ वा. कानिफनाथ मंदीर, वडगांव मावळ येथे पिंपरी चिंचवड चे जेष्ठ सल्लागार विजय राजपाठक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
प्रमुख मार्गदर्शक पश्चिम भारत संघटक सचिव सुभाषराव पोखरकर यांनी सर्व पेन्शनराना जागृत होण्याचे आवाहन करून, कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर चालू असलेल्या रु. ७५००/- पेन्शन वाढ व्हावी. त्यात महागाई भत्ता द्यावा. मोफत वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी सुरु असलेल्या लढ्याची सविस्तर माहिती दिली. राष्ट्रीय संघर्ष समिती आपल्या चार सुत्री मागण्यांवर ठाम असून सरकारवर दबाव वाढविण्यासाठी मोठ्या संखेने संघटनेच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले व उपस्थितांच्या सर्व शंकाचे निरसन केले. सर्वांनी एकमुखाने कमांडर अशोकराव राऊत यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले. सभेत नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला तसेच जेष्ठ पेन्शनर मनोहर बागेवाडी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
सभेस पिंपरी चिंचवड अध्यक्ष इंद्रसिंग राजपूत, सचिव श्रीधर जलवादी, कार्याध्यक्ष जीवन राणे, संगमनेरचे जेष्ठ नेते लक्ष्मणराव हासे, संगमनेर तालुकाध्यक्ष अशोक देशमुख हजर होते. सभा यशस्वीसतेसाठी नितिन आंबळ, सुरेश कुडे, शंकर शेवकर, राजाराम नाटक, दिलीप चौधरी, शांताराम कुडे, मनोहर बागेवाडी, चंद्रकान्त झरेकर, प्रवीण जोशी, राजाराम चव्हाण आदी पेन्शनरांनी अतिशय परिश्रम घेतले.