अहिल्यानगर
आदिमातेचा नवरात्रउत्सव म्हणजे स्त्रीजीवनाचा गौरव-संगीता फासाटे
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : भारतीय संस्कृती ही आदर्श जीवनमूल्ये सांगणारी संस्कृती असून स्त्रीजीवनाचा गौरव करणारा आदिमातेच्या नवरात्रउत्सव हा महिलासबलीकरणाचा संदेश देणारा उत्सव असल्याचे विचार खोकर येथील गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका संगीता फासाटे यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष संगीता फासाटे यांचे दूरदर्शी माध्यमातून नेवासा येथील ज्ञानज्योती समूहतर्फे ज्ञानजागर नवरात्रीचा निमित्ताने “कवितेतून स्त्रीशक्तीचा जागर “या विषयावर प्रबोधपर व्याख्यान झाले, त्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून संगीता फासाटे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी चांदा येथील जिल्हा परिषद सदस्या सविताताई अडसुरे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक डॉ बाबुराव उपाध्ये उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे यांच्या नियोजनानुसार हा ज्ञान जागर सुरु झाल्याची माहिती सुप्रिया झिंझुर्डे यांनी दिली. पाहुण्यांचा परिचय शांता मरकड, दहातोंडे यांनी करून देऊन देवीवेशभूषेत गीत, सादर नृत्य सादर केले. बेलपांढरी गावातील मुलांनी मनीषा डावरे यांच्या संयोजनाखाली आरती म्हटली. संगीता फासाटे यांनी अनेक कवितेतून आदिशक्तीचा जागर व्यक्त केला. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी “ज्ञानजागर विवेक “कवितेतून स्त्रीपुरुष समानतेचा विचार मांडून सर्व ज्ञानज्योतीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. सर्वक्षेत्रात महिलांना पन्नास टक्के आरक्षण असले तरच समता निर्माण होईल. घरात ज्येष्ठाचा सन्मान आणि आपुलकी निर्माण झाली पाहिजे, कारण ज्येष्ठ म्हणजे अनुभवी ज्ञानाची शिदोरी असते. प्रत्येक कुटुंबात स्त्रीसन्मान आणि अधिकार हेच आदिमातेचे खरे पूजन आहे, ते व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. सविताताई अडसुरे यांचे अध्यक्ष भाषण झाले. सूत्रसंचालन रुपाली वाघुले यांनी केले तर सुनीता कर्जुले यांनी आभार मानले, 80महिलांनी सहभाग नोंदविला.