अहमदनगर

डॉ.बाबुराव उपाध्ये आणि प्रा.नंदकिशोर कुऱ्हे यांचा माउली वृद्धाश्रमात सन्मान-सुभाष वाघुंडे

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : माऊली वृद्धाश्रमात नेहमीच गुणीजण आणि देणगीदारांचा सन्मान करणे ही संस्कृती जपली जाते. साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये यांना ‘श्रीरामपूर भूषण पुरस्कार ‘ लाभला आणि प्रा.नंदकिशोर कुऱ्हे यांचे समाजासाठी मोठे योगदान आहेे. त्याप्रीत्यर्थ दोघांचा सन्मान करण्यात मोठे समाधान वाटले असे विचार माऊली वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव वाघुंडे यांनी व्यक्त केले.

येथील रेल्वे उड्डाण पुलाजवळील माउली वृद्धाश्रमात डॉ. बाबुराव उपाध्ये यांना श्रीरामपूर भूषण पुरस्कार लाभल्याबद्दल आणि प्रा.नंदकिशोर कुऱ्हे यांनी सेवानिवृत्तीनंतर विजयानंद सरगम वाचक ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि अनेक संस्थासाठी मोठे योगदान दिले, देत आहेत, त्याबद्दल माउली वृद्धाश्रमाच्या वतीने डॉ. उपाध्ये आणि प्रा.कुऱ्हे यांचा सुभाष वाघुंडे आणि सौ. कल्पनाताई वाघुंडे यांनी बुके, शाल, भेटवस्तू देऊन सन्मान केला. त्याप्रसंगी सुभाष वाघुंडे बोलत होते.

यावेळी राजेंद्र रासने, गौरव रासने, तुकाराम मोरे, सुरेश सोनवणे, संतोष भालेराव, इंदुबाई दशरथ सोनवणे, उषाताई मिसाळ आदी उपस्थित होते. सौ. कल्पनाताई वाघुंडे यांनी स्वागत, प्रास्तविक केले. सुभाष वाघुंडे यांनी आपल्या मनोगतात पुढे सांगितले की, सर्वांच्या सहकार्याने हा वृद्धाश्रम सुरु आहे. दि. 09 सप्टेंबर 2021 रोजी तालुका विधी सेवा समितीतर्फे ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त मार्गदर्शन लाभले. श्रीरामपूरचे जिल्हा अतिरिक्त जिल्हा न्यायधीश, तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष अभिजित अ. नांदगावकर आणि 04 थे सह दिवाणी न्यायधीश श्रीमती डी.एस.खोत आणि ॲड. गणेशजी सिनारे यांचे अनमोल मार्गदर्शन आणि सहयोग लाभले. आज डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रा.नंदकिशोर कुऱ्हे यांचे श्रीरामपूरसाठी साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे, त्यांचा सत्कार त्यांच्या सत्कार्याचा आहे, असे वाघुंडे यांनी सांगितले.

डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सांगितले की मी 1967 पासून श्रीरामपूरात आहे. हॉटेल, घरगडी, दुकानगडी, फळविक्री अशी अनेक कामे करून शिक्षण घेतले. छल्लाणी, सोमाणी, गलांडे, मुरकुटे, लासूरकर, मुठे, साठे, पेडणेकर, उबाळे, मांढरे, कसबेकर, पाटील, खरात, चौगुले, नामे, घोडे, आदिक, ताके, गायके, कुलकर्णी, छाजेड, चोरडिया, शिंदे अशा कित्येक परिवाराने विद्यार्थी निराधार प्रसंगी आपणास पोरक्या अवस्थेत मदत केली, आधार दिला म्हणून आपले शिक्षण झाले. श्रीरामपूर नगरपरिषद आणि नगरााध्यक्ष अनुराधा आदिक यांनी आपल्या कार्याची दखल घेतलीी. त्याबद्दल कौतुक करून आठवणी सांगितल्या, वाघुंडे परिवारास धन्यवाद दिलेे.

प्रा. नंदकिशोर कुऱ्हे यांनी माऊली वृद्धाश्रम हे सेवेचे मंदिर आहे, येथे जिते जागते देव आहेत. त्यांच्या सेवाकार्याला देणगी देण्यातच खरी मानवभक्ती आहे, अशा निर्मळ कार्याला फ्रिज आणि विठ्ठल, रुक्मिणी मूर्ती दिल्या. तसेच सत्काराबद्दल आभार मानून त्यांनी 20 खुर्च्या देणगी देण्याचे घोषित केले. आता या वृद्धाश्रमाच्या बांधकामाला सर्वांनी हातभार लावला पाहिजे आणि ह्या मानवसेवा कार्याला आर्थिक, कागदपत्रपूर्तता आणि होणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी मदत करावी असे त्यांनी आवाहन केले. सौ.कल्पनाताई वाघुंडे यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले.

Related Articles

Back to top button