शिक्षणवारी ज्ञान पंढरी

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत महेश मुनोत विद्यालयाचे उत्तुंग यश

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील अ. ए. सोसायटीच्या महेश मुनोत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सन २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या शासनाच्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध (MTS) परीक्षेत विद्यालयाने उत्तुंग यश मिळवले आहे.
परीक्षेस २० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा १०० % निकाल लागला आहे. इयत्ता ८वी प्रज्ञाशोध परीक्षेत कु. तन्वी जगदाळे ही विद्यार्थिनी जिल्ह्यात पाचवी आली, कु.प्रेरणा व्यवहारे या दहावीच्या विद्यार्थिनीने विशेष पारितोषिक मिळवले तर कु. सुवर्णा गाढे हीस इयत्ता ९वी प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

सर्व गुणवंत, प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना प्रशालेचे को- चेअरमन हेमंत मुथा यांच्या हस्ते विशेष पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. हेमंत मुथा यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे. प्राचार्या नितीशा चावरे यावेळी म्हणाल्या की, शाळेचे नियोजन व विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे शाळेने हे यश संपादन केले आहे.

Related Articles

Back to top button