अहिल्यानगर
उर्जामंत्री डॉ. राऊत यांचा वाढदिवस गरजूंना मदत करुन साजरा
चिंचोली/बाळकृष्ण भोसले : राज्याचे ऊर्जा मंत्री तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अ.जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.डॉ. नितीन राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम व काँग्रेस अनुसुचित विभागाच्या वतीने कोरोनाचे नियम पाळत गरजूंना विविध वस्तुंचे वाटप करण्यात आले.
गरजूंना मास्क, सॅनिटायझर ,फळे, वह्या पेन व किराणा किटचे तसेच कपड्यांचे वाटप फोरमचे जिल्हाध्यक्ष तथा काँग्रेसच्या अनु जाती सेलचे प्रदेश समन्वयक संजय भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल पाटील, सुरेश शिरसाठ, रखमाजी क्षिरसागर, जिल्हाध्यक्ष काँग्रेस एस. सी.विभागाचे राजेंद्र वाघमारे, काँग्रेस प्रदेश समन्वयक शिवाजीराव जगताप, बंटी यादव , नामदेव चांदणे, सुभाष तोरणे, अल्पसंख्याक काँग्रेसचे दिपक कदम, राहुरी तालुका काँग्रेस एस.सी.विभाग अध्यक्ष बाबासाहेब संगळगिळे, महिपती शिरसाठ, सचिन शिंदे, संदेश साळवे, आदीचे सहकार्य लाभले.हा संजय भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.