बिडकीन येथील व्हेरॉक कंपनीसमोर बसलेल्या उपोषणकर्त्यांना स्वाभिमानी छावा संघटनेचा पाठिंबा
व्हेरॉक पॉलीमार प्रायव्हेट लिमिटेड प्लांट नं. ४ फारोळा बिडकीन (ता.पैठण) येथिल ४८ कामगारांनी जानेवारी २०२० मध्ये औरंगाबाद मजदुर युनियन चे सभासद झाले म्हणून कंपनी व्यवस्थापनाने त्या ४८ कामगारांना १ फेबुवारी २०२० रोजी कामावरून काढून टाकले. मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीचे कारण सांगून कंपनी व्यवस्थापनाने त्यांना कामावरून काढून टाकत कामावर घेण्यास टाळाटाळ केली.
जवळपास दोन वर्षांपासून सर्व कामगार बेरोजगार झाले आहेत. कामगार संघटनेने वेळोवेळी कामगार उपायुक्त कार्यालयास निवेदन सादर केले. त्यावर चर्चा करण्यासाठी कंपणी व्यवस्थापन तयार नाही.१० ते १२ वर्षांपासून काम करत असलेल्या कामगारांना कंपनी बाहेर ठेवून इतर कामगार कामावर घेतले, त्यामुळेच कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. कामगारांनी दि.१२ नोव्हेंबर पासुन कंपनीच्या गेट समोर अमरण उपोषण सुरु केले आहे. उपोषण करते कामगारांना स्वाभिमानी छवा संघटनेच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
त्या कामगारांना पुन्हा कामावर रूजू करून घ्यावे नसता स्वाभिमानी छावा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज पाटील मुरदारे यांनी पाठिंबा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी नगरसेवक सागर फरताळे,विजय शेळके,धनंजय चिरेक, गणेश कळसकर, संतोष कुसेकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.