अहिल्यानगर
लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ शिर्डी मतदारसंघात कडकडीत बंद
लोणी प्रतिनिधी : महाविकासआघाडी मधील सर्व घटक पक्ष व मित्र पक्षांच्या वतीने राहाता, शिर्डी शहर व तालुक्यातील लोणी, कोल्हार, बाभळेश्वर, साकुरी, सह सर्व शिर्डी मतदारसंघातील गावांमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
यावेळी कोल्हार येथे स्व. माधवराव खर्डे पा चौकात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रातील मोदी व युपीतील योगी सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे कार्यकर्ते सह लोणी खुर्द चे सरपंच जनार्दन घोगरे, कोल्हारचे मा सरपंच सुरेंद्र खर्डे, अ.नगर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत मापारी, काँग्रेस नेते बाळासाहेब खर्डे, शिवसेना नेते आनिल बांगरे, विलास घोगरे, मायकल ब्राम्हणे, रणजित आहेर, संजय आहे यांच्यासह कोल्हार बु व भगवतीपुर मधील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.