अहिल्यानगर
शिवशंभू छावा प्रतिष्ठानचा महाराष्ट्र बंदला पाठींबा
राहुरी प्रतिनिधी : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेचा निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या शेतकरी आंदोलनास शिवशंभू छावा प्रतिष्ठानचा पाठींबा असून महाराष्ट्र बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती राज्य संपर्क प्रमुख सतीश सौदागर यांनी दिली.
लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून, उद्या दि. 11 ऑक्टोबरला हा बंद पुकारण्यात आला आहे. या आंदोलनास शिवशंभू छावा प्रतिष्ठानचा पाठींबा असून महाराष्ट्र बंद आंदोलनात सहभागी होणार आहे. शिवशंभू छावा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन राज्य संपर्क प्रमुख सतीश सौदागर यांनी केले आहे.