अहिल्यानगर
साहेब कांशीरामजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त राहुरीत बसपाची अभिवादन सभा
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : बसपा राष्ट्रीय अध्यक्ष मायावतीजी (पूर्व मुख्यमंत्री उत्तर प्रदेश) यांच्या तत्वधानातील ‘कही भूल ना जाये हम’ या कार्यक्रमांतर्गत मा. खासदार रामजी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश प्रभारी प्रमोदजी रैनाजी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड.संदिप ताजणे यांच्या सूचनेनुसार शनिवार, ०९ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११:०० वा. धर्माडी विश्रामगृह, राहुरी येथे बहुजन मसिहा बहुजन नायक साहेब कांशीरामजी यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा घेण्यात आली.
या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश सचिव अण्णासाहेब धाकतोडे, प्रभारी अहमदनगर जिल्हा ॲड. प्रकाश संसारे, माजी जिल्हा उपाध्यक्ष अहमदनगर सुनील तांबे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन सोसायटी अहमदनगर संस्थापक अध्यक्ष ॲड. बी.एफ. दिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमास साहेब कांशीरामजींचा सहवास लाभलेले प्रमुख वक्ते म्हणून बसपा बामसेफचे ज्येष्ठ प्रशिक्षक प्रा.चंद्रकांतजी भोसले, राष्ट्रीय संस्कार प्रमुख बौद्ध महासभा प्रा. भन्तेजी सत्येंद्रजी तेलतुमडे यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास बहुजन चळवळीतील बसपा माजी जिल्हा उपाध्यक्ष मुजफ्फर पठाण, एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्हारी पवार, महाराष्ट्र राज्य मल्टीमीडिया ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनचे भाऊसाहेब मनतोडे, आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडलिस्ट तायक्वांदो डॉ. नारायण माळी, प्रा. के. के. पवार, एकलव्य भिल्ल संघटनेचे नामदेव पवार, जिल्हाध्यक्ष प्रबुद्ध चर्मकार भाईचाराचे विजय कांबळे, सय्यद रज्जाकभाई, राहुरी तालुका अध्यक्ष वंचित आघाडीचे अनिल जाधव, वंचित आघाडी राहुरी शहराध्यक्ष पिंटूनाना साळवे, निलेश जगधने, कांतीलाल जगधने, मनोज शिरसाट, अक्षय साळवे, नितीन बर्डे, सागर साळवे आदी कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते.